ही ८ वर्षाची मुलगी आहे शस्त्रात पारंगत, वडिल म्हणतात आम्हाला कसलीही भीती नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:45 PM 2021-10-27T18:45:39+5:30 2021-10-27T19:05:05+5:30
दिवाळीला फटाके उडवण्याच्या बंदुकीपासूनही आपण लहान मुलांना दूर ठेवतो. मात्र अमेरिकेत असं एक कुटुंब आहे, ज्यांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलीला खतरनाक हत्यारं हाताळायला आणि चालवायला शिकवलं आहे. शस्त्रसमर्थक अमेरिकेची पोस्टर गर्ल म्हणून या मुलीकडे पाहिलं जात आहे. ही आहे 8 वर्षांची ऑटम फ्राई. रायफल, हँडगन आणि फ्लेम थ्रोअरसारखी शस्त्रं अगदी लिलया हाताळताना ती यूट्यूब चॅनेलवर दिसते. तिचे लाखो फॉलोअर्स आणि फॅन्स आहेत.
पेनसिल्वेनियात राहणाऱ्या फ्राई परिवारानं गेले काही दिवस गरिबीत काढले. आता मात्र त्यांच्याकडं शस्त्रांचा मोठा साठा जमला आहे.
लहानपणापासूनच या शस्त्रास्त्रांची सवय झाल्यामुळे ऑटमला त्यांची अजिबात भीती वाटत नाही. तिच्या या छंदामुळे तिचे 1 लाख 60 हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत.
सामान्यतः पालक आपल्या मुलांना शस्त्रांपासून दूर ठेवताना दिसतात. मात्र ऑटमचा हा छंद तिच्या आईवडिलांनाना आवडत असून तिला ते प्रोत्साहन देत आहेत.
आपल्या मुलीला लहानपणापासूनच बंदूक आणि सुरक्षेबाबतचे धडे दिल्याचं तिचे वडील सांगतात. जेव्हा ती 7 वर्षांची होती, तेव्हापासूनच त्यांनी तिचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
जेव्हा मुलगी शस्त्र चालवते, तेव्हा तिच्याजवळ उभे राहून वडील तिचं निरीक्षण करतात. वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती देणारे 77 व्हिडिओ तिनं आतापर्यंत तयार केले आहेत.
ऑटम अगदी आत्मविश्वासानं कानात हेडफोन घालत आणि सेफ्टी गॉगल लावत गन लोड करते आणि लक्ष्याचा वेध घेते. तिचे वडील तिला छोटी पिस्तुल देतानाही एका व्हिडिओत दिसतात.
अमेरिकेत शस्त्रास्त्रविरोधी कायद्याबाबत विचारलं असता, आपल्याला त्याची पर्वा नसल्याचं तिचे वडील सांगतात. आपल्या मुलीचं भवितव्य हे शस्त्रास्त्रांशीच संबंधित असेल, याची त्यांना खात्री आहे.
अमेरिकेत बंदुकांच्या बाबतीत अनेक अपघात आणि गुन्हे घडले आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि बंदुका याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.