आपल्या सुंदरतेला वैतागून मॉडलने घेतला असा निर्णय, फॅन्सना होत नाहीये सहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:59 PM2022-12-07T15:59:42+5:302022-12-07T16:05:38+5:30

Model Emily Adonna: एमिलीने एका मुलाखतीत जास्त सुंदर असण्याचे नुकसान सांगितले. तसेच ती तिला तिच्या सुंदरतेमुळे मिळत असलेले टोमण्यांमुळे वैतागली असंही म्हणाली.

Model lists the disadvantages of being pretty: सुंदर दिसण्यासाठी लोक नको नको ते करतात. खासकरून तरूणी आणि महिलांबाबत सांगायचं तर सुंदरतेबाबत कौतुक केलेलं त्यांना खूप आवडतं. अशात जर एखाद मॉडल फाटलेले कपडे घालून मेकअप न करता फिरत असेल काय म्हणणार? ही कहाणी आहे सुपरमॉडल एमिली एडोनाची. एमिलीने एका मुलाखतीत जास्त सुंदर असण्याचे नुकसान सांगितले. तसेच ती तिला तिच्या सुंदरतेमुळे मिळत असलेले टोमण्यांमुळे वैतागली असंही म्हणाली. त्यामुळे तिने एक धक्कादायक निर्णय घेतला.

असं नेहमीच म्हटलं जातं की, पुरूषांच्या तुलनेत महिलांना मेकअप करणं, सजणं हे जास्त आवडतं. बऱ्याच महिला मेकअप केल्याशिवाय सोबतच चांगले कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. पण ही सुंदर मॉडल एमिली तिच्या सुंदरतेला इतकी वैतागली आहे की, ती सुंदर दिसू नये म्हणून फाटलेले कपडे घालते आणि विचित्र टॅटू काढते.

एमिली असं करत आहे की, तिला तिची नॅच्युरली ब्युटी स्वत:च्या हाताने खराब करायची आहे. जेणेकरून लोकांचं तिला जराही अटेंशन मिळून नये. भलेही हे ऐकायला वेगळं वाटत असेल, पण एमिलीला सुंदर दिसण्यात जराही रस नाहीये.

'डेली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एमिली एडोना (Emily Adonna) ने मुलाखतीत स्पष्ट केलं की, तिला सुंदर दिसण्याचा प्रिविलेज नकोय. ती थेट म्हणाली की, सुंदर दिसण्याचे अनेक फायदे तर असतातच, पण अनेक मोठे नुकसानही असतात.

एमिलीच्या जबरदस्त लूकमुळे मॉडलिंग इंडस्ट्रीत तिची चलती आहे. तिचं मत आहे की, मॉडलिंग एक सिजनल प्रोफेशन आहे. अशात घरातील खर्च चालवण्यासाठी जॉबची गरज पडते. अशात तिला अनेकदा नोकरी करताना लैंगिक छळाचा सामना करावा लागला. एमिलिने सांगितलं की, ऑफिसमध्ये ज्यूनिअर असो वो सिनीअर जेव्हा ज्याचं मन होतं तेव्हा तो तिला स्पर्श करतो. तेच अनोळखी लोक तर बाहेरही तिला छेडण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं मला फार वाईट वाटतं.

एमिलीने सांगितलं की, मी विनाकारण अटेंशन मिळण्याला वैतागली आहे. त्यामुळे मी माझ्या सुंदरतेला वाईट मानत आपला अवतार बदलून कमी आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून लोक मला चिकटण्याऐवजी माझ्यापासून दूर रहावे.

एमिलीने लोकांच्या वाईट नजरांपासून वाचण्यासाठी ट्रोल्सना उत्तर देण्याऐवजी स्वत:च्या लूकमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने सगळ्यात आधी आपल्या फॅशन स्टेटमेंट आणि स्टाइलमध्ये बदल केला.

या प्लानिंगनुसार एमिली सध्या जुने, फाटलेले आणि सैल कपडे घालून बाहेर जाते. इतकंच काय तर तिने तिच्या हातावर फार वाईट टॅटू काढून घेतला आहे. जो बघून लोक तिच्या जवळ येत नाहीत.

एमिलीने तिच्या नाकात एक अजब रिंग घातली आहे. ती सांगते की, लोक आता तिच्याकडे आधीसारखे आकर्षित होत नाहीत. हे सगळं करून तिला जो आनंद मिळतो ते मोठं यश आहे. पण तिचे फॅन्स तिच्या या वागण्याचं समर्थन करत नाहीत. त्यांना वाटतं की, तिने आधीसारखं सुंदर दिसावं. त्यामुळे ती मुलाखतीत हेही म्हणाली की, माझं मत आहे की, अत्याचाराचं सुंदरतेसोबत काही देणं-घेणं नाही. या समस्या तर सगळ्याच मुलींना फेस कराव्या लागतात. कदाचित मी जास्त वैतागली आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.