'Everything for you', a rose garden for the blind wife in japan
'तुमच्यासाठी कायपण', अंध पत्नीसाठी फुलवली गुलाबाची बाग By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 08:13 PM2019-07-25T20:13:48+5:302019-07-25T20:20:06+5:30Join usJoin usNext मिस्टर कुरोकी आणि मिसेस कुरोकी यांचे लग्न 1956 साली झाले होते. जपानच्या shintomi येथे एक डेअरी फार्म चालवतात. मिसेस कुरोकी जेव्हा 52 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांची दृष्टी गेली. अंधत्व आल्यामुळे त्या नेहमीच निराश राहत होत्या. त्यामुळे मिस्टर कुरोकी हे पत्नील घेऊन बगिचामध्ये घेऊन जातात. आपली पत्नी हे सौदंर्य पाहू शकत नसल्याचे त्यांनाही दु:ख वाटत. त्यामुळे पत्नीला सौदर्यांचा भास करुन देण्यासाठी कुरोकी यांनी चक्क गुलाबाची बगिचाच लावली. Shibazakuru नामक फुलांच्या या बगिचेला दूर-दूरुन लोक भेट देऊ लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नीचा उत्साह वाढला आणि त्या अधिकच आनंदी बनल्या. या जोडप्यांनी लावलेला एक छोटासा बगिचा आज मोठं पर्यटन स्थळ बनला आहे. या बगिचेला फुलांच्या मौसमात 7 हजार लोक भेट देतात. पत्नीसाठी कायपण, असे म्हणत मिस्टर कुरोकी यांनी अंध पत्नीला गुलाबी बगिचाचा सुगंध बहाल करुन त्यांचं जीवन सुंदर बनवलंय. टॅग्स :जपानजपानी गार्डनJapanJapanee Garden