बाबो! ईमेल नाही तर पॉर्न व्हिडीओतून साथीदारांशी बोलत होता लादेन, अॅक्टदरम्यान पुटपुटत होत्या तरूणी! By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 10:47 AM 2020-09-08T10:47:54+5:30 2020-09-08T10:58:41+5:30
लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये मारण्यात आलं होतं. जिथे तो राहत होता तिथे कोणताही कॉम्प्युटर नव्हता आणि ना इंटरनेट कनेक्शन होतं. या घरात लादेन २२ लोकांसोबत राहत होता. दहशतवादी हैदोस घालण्यासाठी एक मोठ्या नेटवर्कमध्ये काम करत असतात. दहशतवाद्यांच्या यादीत ओसामा बिन लादेनचं नाव सर्वांनाच आठवत असेल. २०११ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यानंतर लादेनचं नाव जास्त चर्चेत आलं होतं. त्यानंतर जगभरातील एजन्सी लादेनचा शोध घेत होत्या.
अनेक वर्षानंतर अमेरिकेने लादेनला पाकिस्तानात मारलं. जिथे त्याला मारलं तिथे अमेरिकन सैनिकांना काही वस्तू आढळल्या. यात पॉर्न सिनेमांच्या अनेक सीडींचा समावेश होता. गेल्या अनेक वर्षांपासून एक्सपर्ट्स या सीडींचा तपास करत आहेत. आता त्यांचं मत आहे की, लादेन या पॉर्न सीडींच्या माध्यमातून आपल्या साथीदारांसोबत संवाद साधत होता, मेसेज पोहोचवत होता.
नॅशनल जिओग्राफी चॅनलवर एका डॉक्युमेंट्रीमध्ये एक्सपर्टने खुलासा केला की, लादेन त्याच्या साथीदारांसोबत संवाद साधण्यासाठी अश्लील सिनेमांचा आधार घेत होता. लादेनला ज्या ठिकाणी मारलं गेलं तिथे अमेरिकन नेव्हीला अनेक डिजिटल आणि रिटेन मटेरिअल मिळालं.
यात अनेक प्रकारच्या अश्लील सिनेमांच्या सीडी आहेत. टीमने या सीडींचा अनेक वर्ष अभ्यास केला. आता त्यांचा दावा आहे की यातील कलाकार शारीरिक संबंध ठेवताना पुटपुटत लादेनचा मेसेज दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत होते.
त्यासोबतच लादेनचे साथीदारही त्यांचा मेसेजे या सीडींच्या माध्यमातून लादेनला पाठवत होते. तपासाच्या सुरूवातीला काहीच लक्षात आलं नव्हतं की, सीडींमध्ये काय आहे. पण एक्सपर्ट्सनी या सीडी पुन्हा पुन्हा पाहिल्या आणि नंतर त्यांना ही गोष्ट आढळून आली.
लादेन कधीही ई-मेलचा वापर करत नव्हता. त्याच्यानुसार ईमेल सुरक्षित माध्यम नव्हतं. त्यामुळे तो या पॉर्न सिनेमांच्या माध्यमातून आपल्या साथीदारांसोबत बातचीत करत होता. याचा खुलासा लादेनच्या पत्रांच्या माध्यमातूनही झाला आहे.
डॉक्युमेंट्रीचं नाव बिन लादेन्स हार्ड ड्राइव्ह असं आहे. या शोनुसार, लादेन या पॉर्नच्या माध्यमातून साथीदारांना कॉन्टॅक्ट करत होता. सुरूवातीला सर्वांना वाटलं होतं की, लादेन मनोरंजनासाठी या सीडी ठेवत असेल, पण नंतर तपासातून सत्य समोर आलं.
लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये मारण्यात आलं होतं. जिथे तो राहत होता तिथे कोणताही कॉम्प्युटर नव्हता आणि ना इंटरनेट कनेक्शन होतं. या घरात लादेन २२ लोकांसोबत राहत होता.
या घरात टीव्ही सेट आणि सीडी प्लेअर्स होते. यांच्या माध्यमातून लादेन सीडी बघत होता. अमेरिकन सेनेने अजून सांगितलं नाही की, त्यांनी एबटाबादमधील घरात त्यांनी काय पाहिलं? पण आता या डॉक्युमेंट्रीने पॉर्न सीडीबाबत सांगितलं आहे.