हॉटेल्समध्ये बेडवर जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:45 PM2023-02-13T15:45:21+5:302023-02-13T16:21:20+5:30

Interesting Facts : तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे का? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे....

वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की, प्रत्येक हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट असते. तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे का? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे....

शांतता - असं मानलं जातं की, पांढरा रंग मनाला शांतता देतो. जितकी शांतता पांढरा रंग पाहून मिळते, तेवढी इतर रंग पाहून मिळत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे या रंगाला पवित्र मानलं जातं.

मळ लगेच दिसतो - बेडशीटचा रंग पांढरा असल्याने ती घाणेरडी झाल्यास किंवा त्यावर मळ लागला तर लगेच दिसून येतो. त्यामुळे ती लगेच बदलता येते.

ब्लीचिंग करणे सोपे - हॉटेलमध्ये आलेले पाहुणे अनेका बेडवर बसून जेवण करतात. अशात पांढऱ्या बेडशीटवर चुकीने जर एखादा डाग लागला असेल तो लगेच दिसतो. आणि त्यावर ब्लीच करणे सोपे होते.

स्ट्रेसपासून सुटका - अनेकदा लोक सुट्यांमध्ये आपला स्ट्रेस घालवण्यासाठी बाहेर फिरायला जातात. अशात त्यांना रिलॅक्स वाटावं म्हणूनही पांढरी बेडशीट वापरली जाते.

खास कारण - 1990 च्या आधी हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या रंगांच्या चादरी वापरल्या जायच्या. त्यावर काही डाग लागले तरी ते दिसून येत नव्हते. त्यानंतर वेस्टिन हॉटेल डिझायनर्सनी एक रिसर्च केला. त्यानंतरच ग्राहकांचा विचार करुन पांढऱ्या रंगाटी बेडशीट वापरण्याचा ट्रेन्ड सुरु झाला.