fascinating things on Earth you had no idea existed
कल्पनेपलीकडचं जग; 'अशा'ही गोष्टी पृथ्वीवर आहेत बरं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:22 PM2018-11-20T21:22:29+5:302018-11-20T21:29:49+5:30Join usJoin usNext व्हंटाब्लॅक हा जगातील सर्वात गडद पदार्थ आहे. ब्रिटनच्या सरे नॅनोसिस्टम्सनं या पदार्थाची निर्मिती केली आहे. कार्बन ट्यूब्सच्या माध्यमातून या पदार्थाची निर्मिती करण्यात आली. ग्लॅकस अटलांटिकस हा मासा एलियनसारखा दिसतो. ब्ल्यू एंजल नावानं तो प्रसिद्ध आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर हा मासा आढळून येतो. एरोजेल हा पदार्थ ढगासारखा दिसतो. जेल आणि गॅसच्या मिश्रणातून हा पदार्थ तयार करण्यात आला आहे. गोठलेला धूर किंवा स्थायूरुपातला बर्फ या नावानं हा पदार्थ ओळखला जातो. यूकलेप्टस डेगलप्टा झाडांचं खोड विविध रंगांचं असतं. या झाडाचं खोड निळ्या, केशरी, जांभळ्या, हिरव्या आणि तपकिरी रंगाचं असतं. कोलंबियात जमिनीखाली एक कॅथड्रेल आहे. हे संपूर्ण कॅथड्रेल मिठापासून तयार करण्यात आलेलं आहे. 1954 मध्ये या कॅथड्रेलची उभारणी करण्यात आली. गॉबलिन शार्क हा जगातील दुर्मिळ माशांपैकी एक आहे. जिवंत जीवाश्म असं या माशाचं वर्णन केलं जातं. इंडोनेशियातल्या कवाह इजेन ज्वालामुखीतून निळा धूर निघतो. ज्वालामुखीतून बाहेर निघणाऱ्या लाव्हारसात सल्फर वायूचं प्रमाण अधिक असल्यानं असं घडतं. इथियोपितील एक परिसर जणू परिग्रहावरचा वाटतो. अफर ट्रँगल भागात असणाऱ्या भूभागातून लाव्हारस बाहेर पडतो. या भागातून नियॉन रंगाचे गरम झरे निघतात. टार्डिग्रेड्स हा सूक्ष्मजीव कोणत्याही परिस्थितीत जीवंत राहू शकतो. -200 अंश सेल्सिअस तापमान असो वा 149 अंश सेल्सिअस तापमान, टार्डिग्रेड्स त्या ठिकाणी तग धरु शकतो. टॅग्स :जरा हटकेपृथ्वीJara hatkeEarth