'Father of the Father of the Nation', the abandoned Idea of the farmer's father
'गरज ही शोधाची जननी', शेतकरी बापाची भन्नाट आयडिया By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:30 PM2019-06-26T12:30:27+5:302019-06-26T12:35:08+5:30Join usJoin usNext इच्छा असेल तर मार्ग दिसेल, मराठीत अशी एक म्हण आहे. या म्हणीचा साक्षात्कार एका शेतकऱ्याने करून दाखवला आहे. शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यासाठी सरकारने आठवीपर्यंत शिक्षण मोफत केले आहे. पण, तरीही इतर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. आर्थिक परिस्थिती बेतीचा असल्याने कम्बोडियातील एक शेतकरी आपल्या मुलास स्कुलबॅग घेऊन देऊ शकत नव्हता. तेव्हा, या शेतकऱ्याने मुलासाठी घरीच स्कुल बॅग बनवली. कंबोडियातील या 5 वर्षीय चिमुकल्याचं नाव नी केंग असे आहे. केंगची स्कुल बॅग पाहून शाळेतील शिक्षकही दंग झाले व त्यांनी इतर पालकांनाही ही बाब सांगितली. शेतकरी बापाने बनवलेली बॅग आपल्या खांद्यावर टाकून मुलगाही मोठ्या उत्साहात शाळेत गेला. शाळेतील शिक्षकांनी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. कंबोडियात एक साधारण स्कुल बॅग खरेदीसाठी किमान 7 डॉलर खर्च येतो. मात्र, एवढीही ऐपत नसल्याने मुलाच्या वडिलांनी घरीच ही स्कुल बॅग बनवल्याचे शिक्षकांनी सांगितले. विशेष म्हणजे केंगच्या वडिलांनी केलेलं काम अनेक विदेशी व्यापाऱ्यांना आवडले असून त्यांनी चक्क केंगच्या वडिलांशी संपर्क केला. त्यामुळे आता केंगच्या वडिलांना नवा व्यवसाय मिळाला आहे. रफिया स्ट्रींगपासून हा सुंदर बॅग बनविण्यात आला आहे. एका वडिलाचं आपल्या मुलावरील प्रेम आणि शिक्षणाची तळमळ समाजाला दाखविण्यासाठी हा फोटो ट्विटरवर टाकल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितले. गरज ही शोधाची जननी आहे, असेही आपण म्हणतो. पण, केंगच्या वडिलांनी या नव्या स्कुलबॅगचा शोध लावून त्याही म्हणीचा साक्षात्कार घडवला. टॅग्स :शाळाशिक्षकशेतकरीविद्यार्थीSchoolTeacherFarmerStudent