असा राष्ट्राध्यक्ष ज्याचे 35 हजार महिलांसोबत होते संबंध, 600 वेळा झाला त्याला मारण्याचा प्रयत्न By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:58 PM 2022-11-26T12:58:06+5:30 2022-11-26T13:15:30+5:30
Fidel Castro : फिडेल कास्त्रो हे नेहमीच त्यांच्या दुश्मनांच्या विचाराच्या दोन पाउल पुढे राहत होते. एकदा तर फिडेल यांना मारण्यासाठी एक महिला त्यांची मैत्रीण बनली. Former Cuban President: जगात एक असाही राष्ट्राध्यक्ष होऊन गेला ज्याबाबत असा दावा केला जातो की, त्याचे 35 हजार महिलांसोबत संबंध होते. त्याशिवाय 600 पेक्षा जास्त वेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण इतक्या हल्ल्यातून वाचले होते. दुश्मन त्यांचं काहीही करू शकले नाही. ही व्यक्ती दुसरं कुणी नाही तर क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्त्रो हे होते.
फिडेल कास्त्रो हे नेहमीच त्यांच्या दुश्मनांच्या विचाराच्या दोन पाउल पुढे राहत होते. एकदा तर फिडेल यांना मारण्यासाठी एक महिला त्यांची मैत्रीण बनली. पण तिलाही यश मिळालं नाही.
क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्यावरील माहितीपटात महिलांसोबतचे त्यांचे संबंध आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यांबाबत सांगण्यात आलं आहे. दुश्मनांनी त्यांनी विषारी सिगार ते स्फोटकांनी मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही.
फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म 13 ऑगस्ट 1926 मध्ये क्यूबाच्या बिरानमध्ये झाला होता. सत्तापालट करून फिडेल कॅस्ट्रो हे क्यूबाचे शासक बनले होते. फिडेल कॅस्ट्रो यांनी कम्युनिस्ट क्यूबाचे जनक मानलं जातं. 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबामध्ये सत्तापालट केली होती. यानंतर ते सतत 2008 पर्यंत शासक होते.
क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी नेहमीच अमेरिकेच्या धोरणांचा विरोध केला. इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्राध्यक्षांची खिल्लीही उडवली. अमेरिकन गुप्तचर संघटनांनी फिडेल यांना अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला. पण ते नेहमीच फेल झाले. फिडेल यांच्यावर 600 वेळा हल्ला करण्यात आला.
फिडेल कॅस्ट्रो यांच्यावरील माहितीपटात दावा करण्यात आला की, त्यांचे 35 हजार महिलांसोबत संबंध होते. हा सिलसिला 4 दशक सुरू राहिला. फिडेल कॅस्ट्रो हे त्यांच्या कठोर नियमांसाठी ओळखले जात होते. साधारण 49 वर्ष त्यांनी क्यूबावर राज्य केलं.
दरम्यान 2008 साली क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी सत्तेची चावी त्यांच्या भावाकडे सोपवली. 90 वयात 25 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं होतं.थी.