First Doctor Plaster The Doll The Baby Girl Gets Treatment In Lok Nayak Hospital
चिमुकलीला लागला बाहुलीचा लळा; उपचारासाठी डॉक्टरांनी केली 'अशी ही बनवाबनवी' By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 06:45 PM2019-08-31T18:45:07+5:302019-08-31T18:47:40+5:30Join usJoin usNext लहान मुलांना एखाद्या गोष्टीचा लळा लागला की, त्याच गोष्टीसाठी ते हट्ट करतात. 11 महिन्याच्या मुलीला तिच्या बाहुलीसह हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलीसोबत त्या बाहुलीला प्लास्टर लावण्यात आलं आहे. चिमुकलीच्या पायाला प्लास्टर करून दोन्ही पाय एका दोरीच्या सहाय्याने वरच्या बाजूला बांधण्यात आलेत. मात्र तिच्या बेडवर ती एकटीच नाही तर तिच्या बाहुलीला तिच्यासोबत तसे बांधण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लढविलेली शक्कल पाहून सगळेच चकीत होतात. डॉक्टर पहिल्यांदा बाहुलीला औषध देण्याचं नाटक करतात त्यानंतर ती चिमुकली काही त्रास न करता औषध घेते. मुलीचं आणि बाहुलीचं अनोखं नातं पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. सध्या या हॉस्पिटलमध्ये गुडियावाली बच्ची म्हणून ही चिमुकली प्रसिद्ध झाली आहे. घरातील बेडवरून पडल्याने या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. उपचारासाठी तिला रूग्णालयात हलविले असता इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरांना त्रास सहन करावा लागला. त्यावेळी तिच्या आईने सांगितले की तिची एक बाहुली आहे. ज्यासोबत ती रोज खेळते. दूध पिताना तिला पहिलं पाजते अन् नंतर ती पिते. डॉक्टरांनी ती बाहुली मागवून घेतली त्यानंतर ती मुलगी आनंदी झाली. डॉक्टर जेव्हा त्या मुलीला पट्टी बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पुन्हा जोरजोरात रडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी प्रथम बाहुलीला पट्टी बांधली त्यानंतर चिमुकलीनेही सहजरित्या डॉक्टरांना पट्टी बांधण्यास सहकार्य केलं. टॅग्स :हॉस्पिटलhospital