जबरदस्त! तब्बल १५ वर्षांनी नॅशनल पार्कमध्ये आढळला दुर्मीळ प्राणी Wolverine By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 03:35 PM 2021-01-21T15:35:43+5:30 2021-01-21T16:00:32+5:30
यलोस्टोन नॅशनल पार्कमधील मॅमथ हॉट स्प्रींग्स व्योमिंग आणि इडाहो यांच्या मधे आहे. वॉल्वरिन हा एक मध्यम आकाराचा मांसाहारी जीव असतो. सामान्यपणे तो उंच डोंगरातील जंगलात राहतो. अमेरिकेतील यलोस्टोन पार्कमध्ये पहिल्यांदाच जगातील सर्वात दुर्मीळ प्राण्यांपैकी एक वॉल्वरिन दिसला. हा वॉल्वरिन पार्कमध्ये लावलेल्या एका कॅमेरात कैद झाला. पार्कमध्ये तो मॅम हॉट स्प्रींग भागात फिरताना दिसला. एक्सपर्ट्सना वाटतं की, आता अशाप्रकारचे दुर्मीळ जीव यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये परत येत आहेत. (All Image Credit : Getty Images)
यलोस्टोन नॅशनल पार्कमधील मॅमथ हॉट स्प्रींग्स व्योमिंग आणि इडाहो यांच्या मधे आहे. वॉल्वरिन हा एक मध्यम आकाराचा मांसाहारी जीव असतो. सामान्यपणे तो उंच डोंगरातील जंगलात राहतो.
हे प्राणी कधीही एकत्र घोळक्याने राहत नाहीत. ते वेगवेगळे राहतात. म्हणून लवकर नजरेस पडत नाहीत. जेव्हा एक वॉल्वरिन यलोस्टोन पार्कमध्ये कॅमेरात कैद झाला होता तेव्हा तज्ज्ञांना फार आनंद झाला होता.
२००६ ते २००९ दरम्यान यलोस्टोन नॅशनल पार्क आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात केवळ सात वॉल्वरिन आढळून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये बायोलॉजिस्टने यांची संख्या जाणून घेण्यासाठी रिमोट कॅमेरे लावले होते. या कॅमेरातून त्यांना शोधण्यात मदत मिळत आहे.
२०१४ सालात लावण्यात आलेल्या कॅमेरांपैकी एका कॅमेरात नुकताच एक वॉल्वरिन दिसला. रात्रीच्यावेळी बर्फाने झाकलेल्या जंगलात एक वॉल्वरिन फिरताना दिसून आला. नॅशनल पार्क सर्व्हिसेजनुसार, वॉल्वरिन वर्षभर अॅक्टिव राहतात. हिवाळ्यात त्यांच्या हालचाली अधिक वाढतात.
हिवाळ्यात खाणं शोधणं जरा अवघड होतं त्यामुळे हे प्राणी आपलं भोजन शोधण्याचा परिसर वाढवतात. वॉल्वरिनचं प्रजनन फार कमी आहे. क्लायमेट चेंजचा प्रभाव आणि शिकार यामुळे हे प्राणी २०५० पर्यंत मोजकेच शिल्लक राहतील.
जास्तीत जास्त वॉल्वरिन दक्षिण रॉकी माउंटेंस, सियेरा नेवादा रेंज आणि ग्रेटर यलोस्टोन आणि आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळतात. असं मानलं जातं की, अमेरिकेत आता ३०० ते १००० वॉल्वरिन शिल्लक राहिले आहेत. यांची संख्या योग्यपणे मोजता येत नसल्याने त्यात अंतर बघायला मिळतं.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये वॉशिंग्टनमधील माउंट रेनिअर नॅशनल पार्कमध्ये वॉल्वरिनचा एक पूर्ण परिवार दिसला होता. हे १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं होतं. त्यानंतर आता यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये एक वॉल्वरिन कॅमेरात कैद झाला आहे.