बेपत्ता झाल्यावर 30 वर्षांनंतर या विमानाने केलं होतं लॅंडिंग, या होतं यामागचं रहस्य? By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:24 PM 2022-06-07T17:24:18+5:30 2022-06-07T17:34:22+5:30
साधारण 67 वर्षाआधी 1955 मध्ये एक अजब घटना घडली होती. ही घटना अमेरिकेतील एका अशा रहस्यमय विमानाबाबत आहे ज्याने उड्डाण घेतल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी दुसऱ्या देशात लॅंड केलं होतं. जगभरात कितीतरी रहस्य आहेत. पण काही रहस्य समजून घेणं अवघड काम आहे. जगभरात अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचं गुपित आजपर्यंत उलगडलं गेलं नाही. अशाच एका हैराण करणाऱ्या रहस्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही एक अशी घटना आहे ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. इतकंच काय तर वैज्ञानिकही हैराण झाले होते.
साधारण 67 वर्षाआधी 1955 मध्ये एक अजब घटना घडली होती. ही घटना अमेरिकेतील एका अशा रहस्यमय विमानाबाबत आहे ज्याने उड्डाण घेतल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी दुसऱ्या देशात लॅंड केलं होतं. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे विमान लॅंड केल्यानंतर पुन्हा एकदा गायब झालं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 जुलै 1955 ला फ्लाइट 914 अमेरिकेच्या न्यूयॉर्कहून मायामीसाठी निघालं होतं. ज्यात एकूण 57 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. पण सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे न्यूयॉर्कहून उड्डाण घेतल्यानंतर आणि मायामीला पोहोचण्याआधी हे विमान आकाशातच बेपत्ता झालं होतं. अमेरिकेने त्यावेळी हे विमान शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.
सध्या विमानाला न्यूयॉर्कहून मायामीला पोहोचण्यासाठी साधारण साडे तीन तास लागतात. 1955 मध्ये विमानाला हे अंतर पार करण्यासाठी साधारण 5 तासांचा वेळ लागत होता.
पण जगभरातील लोक तेव्हा जास्त हैराण झाले जेव्हा हे 1955 मध्ये बेपत्ता झालेलं विमान फ्लाइट 914 30 वर्षांनंतर 9 मार्च 1985 रोजी रहस्यमयपणे व्हेनेजुएलाच्या कारकास एअरपोर्टवर लॅंड झालं. या विमानाबाबत ट्रॅफिक कंट्रोलरला सुद्धा काही माहिती नव्हती. लॅंडिंगनंतर या काही वेळाने पुन्हा या विमानाने उड्डाण घेतलं आणि पुन्हा आकाशात ते गायब झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारकास एअरपोर्टवर विमानाच्या लॅंडिंगनंतर पायलटने तेथील स्टाफला विचारलं होतं की, हे कोणतं वर्ष सुरू आहे? ग्राउंड स्टाफने पायलटला सांगितलं की, हे 1985 साल सुरू आहे. हे ऐकल्यानंतर पायलट जोराने श्वास घेऊ लागला होता. तसेच म्हणाला होता की, 'ओह...माय गॉड. त्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण घेतलं आणि गायब झालं.
या रहस्यात किती सत्यता आहे हे सांगण अवघड आहे. पण 9 मार्च 1985 नंतर या बेपत्ता विमानाबाबत काही समजू शकलेलं नाही. असं म्हणतात की, अमेरिका आजही या विमानाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहे.