भारतात आहे एक रहस्यमयी चर्च जे फक्त उन्हाळ्यातच दिसते, याला तरंगणार चर्च असंही म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:44 PM 2021-10-11T18:44:07+5:30 2021-10-11T19:06:30+5:30
भारतात एक चर्च आहे जे तुम्ही फक्त उन्हाळ्यातच पाहू शकता. असं म्हणतात हे चर्च पाण्यावर तरंगत. या चर्चच्या उभारणीमागे एक विचित्र कथा देखील आहे. आज हे चर्च रहस्यमयी चर्च म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, या ठिकाणां संबधीच्या कथा, इतिहास आणि त्यांची रचना लोकांना आश्चर्यचकीत करतात.
भारतात असेच एक रहस्यमयी चर्च आहे. पावसाळ्यामध्ये हे चर्च संपूर्ण पाण्याच्या खाली जाते, आणि उन्हाळयामध्ये ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळते.
हे चर्च कर्नाटकातील हसनपासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या शेट्टीहल्ली रोझरी येथे स्थित आहे. तेथील स्थानिक लोक या चर्चला बुडणारे चर्च किंवा तरंगते चर्च म्हणून ओळखतात.
सध्या हे चर्च भग्नावस्थेत आहे, तरीही त्याचे बांधकाम पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की हे चर्च उत्तम कलाकृतीचा एक अद्भूत नमुना आहे.
हे चर्च १८६० मध्ये फ्रेंच मिशनऱ्यांनी बांधले होते. नंतर १९६० च्या दशकात,येथे गोरूर जलाशय बांधण्यात आले, जेणेकरून हेमवती नदीचे पाणी अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल.
परंतु त्यानंतर या चर्चच्या आसपासची जमीन वालुकामय झाली आणि हळूहळू ही जागा निर्मनुष्य झाली.
या चर्चच्या आसपासची जागा आता जवळपास वर्षभर पाण्यात बुडाली आहे. म्हणूनच हे चर्च खूप खास आहे.
जर तुम्ही पावसाळ्यात येथे गेलात तर फक्त एक तृतीयांश चॅपल म्हणजेच (लहान चर्च) दिसू शकते.
रोझरी चर्चमध्ये आता एक गूढ आकर्षण आहे झाले आहे. आता हे चर्च पक्ष्यांचे घर झाले आहे.
या चर्चचे नवीन नाव 'द ड्रॉऊनिंग' चर्च ठेवण्यात आले आहे.