बाबो! झाडाच्या एकाच खोडापासून साकारली सिंहाची कलाकृती, ३ वर्षाची मेहनत आली फळाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:14 PM2020-01-21T16:14:16+5:302020-01-21T16:20:00+5:30

लाकडापासून तयार अनेक कलाकृती तुम्ही पाहिल्या असतील, पण चीनमधील सेंट्रल चायनीज सिटी स्क्वेअरवर एका सिंहाची कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही लाकडाची कलाकृती तर आहेच, पण त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे हा सिंह एका झाडाच्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे.

ही कलाकृती तयार करण्यासाठी कलाकारांना जवळपास ३ वर्षांचा कालावधी लागला. आर्किटेक्ट Dengding Rui Yao यांनी ही कलाकृती तयार केली असून त्यांना यासाठी २० लोकांनी मदत केली.

म्यानमारमध्ये या कलाकृतीला आकार देण्यात आलाय.

२०१५ मध्ये सिंहाची ही कलाकृती तयार करण्यात आली असून नंतर ती ३ हजार मैल दूर Wuhan’s Fortune Plaza Times Square इथे पाठवण्यात आली.

ही कलाकृती ४७.५ फूट लांब, १६.५ फूट उंच आहे. याला ओरिएंटल लॉयन असं नाव देण्यात आलं आहे.

सिंहाचं चीनमधील संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. चीनमधील अनेक महत्वाच्या प्रवेशद्वारांवर सिंहाची कलाकृती बघायला मिळते. आज अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या बाहेरही सिंहाच्या छोट्या छोट्या कलाकृती बघायला मिळतात.

चीनमधील ही कलाकृती आता जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरत आहे. तर ही कलाकृती तयार करणाऱ्या कलाकारांचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.

झाडाच्या एकाच खोडापासून तयार केलेली ही बहुदा सर्वात मोठी कलाकृती असावी.

ही सिंहाची कलाकृती रेडवूड ट्रीपासून तयार करण्यात आली आहे. हे झाड ३०० फूटापर्यंत वाढू शकतं. आणि याच्या लाकडाचा रंग लाल असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये हे झाड दिसून येतं.

या झाडांची खासियत म्हणजे ही झाडे अनेक वर्ष जगतात. या झाडांचं आयुष्य तीन हजार वर्ष इतकंही असल्याचं सांगितलं जातं.

ही कलाकृती बघण्यासाठी लोक गर्दी करतात.