Giant manta ray weight 750 kg was caught by fishermen off karnatakas coast
वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 07:42 PM2020-10-22T19:42:19+5:302020-10-22T19:58:06+5:30Join usJoin usNext कर्नाटकच्या समुद्रात मासेमारी करत असलेल्या एका माणसाच्या हाती भलामोठा मासा लागला आहे. या माश्याचे नाव मंटा रे आहे. मासेमारांनी जेव्हा मंटा रे माश्याला बाहेर काढलं तेव्हा या माश्याचे वजन ७५० किलोग्राम होतं. मंगलुरूमध्ये बुधवारी मालपे बंदरात मासेमार सुभाष सैलान खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान मंटा रे एक ७५० किलोग्राम आणि दुसरा २५० किलोग्रामचा मासा त्यांच्या गळाला लागला. मंटा रे एक विशालकाय समुद्री जीव आहे. जीनस मँचा प्रजातीचा हा जीव जवळपास ७ मीटर लांब असतो. छोटा अल्फेडी नावाच्या माशाची लांब ५.५ मीटर इतकी असते. या माश्याचे त्रिकोणाप्रमाणे पेक्टोरल पंख असून पंख आणि तोंडाला माइलियोबॅटिफॉर्म या वर्गात विभागण्यात आलं आहे. हा मोठा मासा सापडल्यानंतर मासेमार सुभाष सैलान आपलं गाव नागासिद्धी येथे घेऊन गेले आहेत. या भल्यामोठ्या माश्याला ट्रकमध्ये टाकण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली होती. (Image Credit- aajtak)टॅग्स :जरा हटकेसोशल व्हायरलमच्छीमारJara hatkeSocial ViralFisherman