Gift these things on new year to loved ones
'या' स्पेशल गिफ्ट्सने मित्रांचं न्यू इअर करा खास! By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:41 PM2018-12-26T16:41:27+5:302018-12-26T17:09:48+5:30Join usJoin usNext 2018 वर्ष संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत आणि २०१९ हे नवं वर्ष उंबरठ्यावर येऊन उभं आहे. नवं वर्ष सर्वांसाठीच नवीन स्वप्ने आणि जीवनाला नव्याने पद्धतीने सुरु करण्यासाठी चांगलं असतं. एक नवी सुरुवात करण्यासाठी गरजेचं असतं की, जुने वाद विसरुन नव्या भविष्याला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करावा. न्यू इअरचं लोक वेगवेगळ्य पद्धतीने स्वागत करतात. तुम्हालाही तुमच्या नव्या वर्षाची सुरुवात खास लोकांना गिफ्ट देऊन यादगार करु शकता. (Image Credit : vakilsearch.com) स्कीनकेअर हॅंपर - प्रत्येक मुलीला स्कीनकेअरशी संबंधित वस्तू फार जवळच्या आणि पसंतीच्या असतात. कारण मुली या आपल्या स्कीनबाबत फार कॉन्शस असतात. अशात तुम्ही तर तुमच्या मैत्रिणीला किंवा परिवारातील एखाद्या महिला सदस्याला स्कीनकेअर हॅंपर गिफ्ट केलं जर हे त्यांच्यासाठी सरप्रायजिंग ठरु शकतं. फिटनेस बॅंड - हे गिफ्ट त्या लोकांसाठी बेस्ट ठरेल ज्यांनी नव्या वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प करण्याचा विचार केला असेल. तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला हा फिटनेस बॅंट गिफ्ट करु शकता. हा फिटनेस बॅंड तुम्ही परिवारातील एखाद्या सदस्यालाही देऊ शकता. याने ते एक्स्ट्रा कॅलरी बर्न करु शकतील. बुक केस - पुस्तकांची आवड असणाऱ्यांसाठी हे बेस्ट गिफ्ट आहे. ज्या लोकांना पुस्तके वाचण्याची किंवा कलेक्शची आवड असते त्यांना तुम्ही हे नव्या वर्षांचं गिफ्ट देऊ शकता. अशाप्रकारचे बुक केस मार्केट आणि ऑनलाइनही सहज उपलब्ध होतील. (Image Credit : Amazon) फोटो अल्बम -जर तुमच्या मित्राला किंवा भावाला फिरण्याचा आणि फोटोग्राफीचा शौक असेल तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट गिफ्ट ठरेल. अलिकडे लोक फोटो जास्तकरुन मोबाइल किंवा कम्प्युटरमध्येच ठेवतात. पण यातून कधीकधी फोटो डिलीट होतात. काहींना अल्बमची अजूनही आवड असू शकते. अशांना हे गिफ्ट नक्की आवडणार. (Image Credit : Alibaba) शेविंग किट - मित्राला काय द्यावं असा विचार पडला असेल तर तुम्ही त्यांना शेविंग किट किंवा ट्रिमर गिफ्ट करु शकता. ही वस्तू सहज कुठेही आणि स्वस्तात मिळू शकते. मोबाइल कवर - तुमच्या मित्राकडे कोणता मोबाईल आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याला कस्टमाइज फोन कवरही गिफ्ट देऊ शकता. तुमच्या मित्राच्या आवडी-निवडी माहिती असेल तर तुम्ही त्यानुसार कवर तयार करुन घेऊ शकता.टॅग्स :नववर्ष 2019नववर्षगिफ्ट आयडियाNew Year 2019New YearGift Ideas