सेल्फी घेण्यासाठी हरणाजवळ गेली तरूणी, पुढे जे झालं त्याची तिने कल्पनाही केली नसेल...

By अमित इंगोले | Published: October 16, 2020 12:18 PM2020-10-16T12:18:02+5:302020-10-16T12:27:34+5:30

ब्लू कलरच्या ड्रेसमधील मुलगी हरणाजवळ गेली. तिने हरणासोबत सेल्फी काढला. पण त्यानंतर जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल.

आजकाल लोक आपलं ऑनलाइन लाईफ एक्सायटिंग असल्याचं दाखवण्यासाठी नको नको त्या गोष्टी करताना दिसतात. कुणी रस्त्यावर विचित्र वागतात तर कुणी जीवघेणे स्टंट करतात. हे सगळं करत असताना लोकांना त्यांच्या जीवाचीही पर्वा राहत नाही. अशीच एक घटना इंग्लंडमधून समोर आली आहे. येथील रिचमंड पार्कमध्ये एक मुलगी सेल्फी घेण्याच्या नादात एका हरणाजवळ गेली. तिला इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो हवा होता. पण या फोटोच्या नादात हरणाने मुलीवर हल्ला केला. रॉयल पार्क्स पोलिसांनी याचा फोटो शेअर केला आहे.

११ ऑक्टोबरची ही घटना आहे. ही मुलगी आपल्या मित्रांसोबत रिचमंड पार्कमध्ये गेली होती. तिथे सगळेच आरामात इकडे-तिकडे फिरत होते. तेव्हा या मुलीच्या मनात इन्स्टाग्रामसाठी एक खास फोटो काढण्याचा विचार आला.

हा फोटो पाहून अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. मुलीचा मूर्खपणा पाहून अनेकजण हैराण झाले. काही लोकांनी अशा गोष्टी करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. कारण या घटनेत काहीही होऊ शकलं असतं.

ब्लू कलरच्या ड्रेसमधील मुलगी हरणाजवळ गेली. तिने हरणासोबत सेल्फी काढला. पण त्यानंतर जे झालं त्याचा तिने विचारही केला नसेल.

हरणाने आपल्या दोन्ही पायांनी मुलीला मागून धक्का दिला. त्यामुळे या मुलीला कंबरेत जोरदार झटका बसला आणि ती खाली पडली. पुढे काही अघटीत घडण्याआधीच मुलीला वाचवण्यात आलं.

रॉयल पार्क्स पोलिसांनी या घटनेचा एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी लिहिले की, चुकूनही असा मुर्खपणा करू नका. प्राण्यांपासून कमीत कमी ५० मीटरचं अंतर ठेवा.

हा फोटो पाहून अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. मुलीचा मूर्खपणा पाहून अनेकजण हैराण झाले. काही लोकांनी अशा गोष्टी करणाऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. कारण या घटनेत काहीही होऊ शकलं असतं.