मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग... By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:41 PM 2021-08-26T12:41:01+5:30 2021-08-26T12:52:42+5:30
तरूणीने लिहिलं की, पहिल्या डेटींग दरम्यान बॉयफ्रेन्डने गंमत केली होती की, जर आपण सोबत राहणार असू तर मला मांजरीला सोडावं लागले. पण मी या गोष्टीला तेव्हा गंभीरतेने घेतलं नाही. जगभरात प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. पाळिव प्राण्यांवर काही लोकांचं इतकं प्रेम असतं की, ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. सोशल मीडियावर एका अशाच तरूणीची लव्हस्टोरी व्हायरल होत आहे. तिने तिच्या पाळलेल्या मांजरीसाठी बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप केलं. इतकंच नाही तर तिने त्याला तिच्या घरातून हाकलून दिलं.
सोशल मीडिया साइट रेडीटवर या मुलीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत लिहिलं. तिच्या पोस्टवर अनेकांनी भरभरून कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी तिला समर्थन दिलं तर काहींनी तिला दोष दिला. तर तरूणी म्हणाली की, ती तिच्या मांजरीशिवाय राहू शकत नाही.
तरूणीने रेडीटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितलं की, 'माझ्याकडे मिल्ली नावाची एक मांजर आहे. ती लहान असल्यापासून माझ्याकडे आहे. तिने सांगितलं की, बॉयफ्रेन्डसोबत पहिल्या डेटवरच मला हे समजून घ्यायला हवं होतं की, त्याला माझी मांजर आवडत नाही. २४ वर्षीय बॉयफ्रेन्डला कुत्रा आवडतो.
तरूणीने लिहिलं की, पहिल्या डेटींग दरम्यान बॉयफ्रेन्डने गंमत केली होती की, जर आपण सोबत राहणार असू तर मला मांजरीला सोडावं लागले. पण मी या गोष्टीला तेव्हा गंभीरतेने घेतलं नाही.
बॉयफ्रेन्ड जेव्हाही घरी येत होता तेव्हा मिल्लीकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस मिल्ली सोफ्यावर बसली होती. तेव्हाच बॉयफ्रेन्ड तिच्यावर जोरात ओऱडला. हे बघून मला राग आला. ज्यामुळे बॉयफ्रेन्डसोबत तिचा मोठा वाद झाला.
या भांडणानंतर तरूणीने लगेच बॉयफ्रेन्डला आपल्या घरातून हाकलून दिलं. तरूणीने सांगितलं की, बॉयफ्रेन्डही रागाने दरवाजा आपटून निघून गेला. त्यानंतर बॉयफ्रेन्डसोबत अनेक दिवस बोलणं झालं नाही. पण जेव्हा दोघांचा राग शांत झाला तेव्हा ते भेटले.
तेव्हा बॉयफ्रेन्डला त्याची चूक समजली होती. तो म्हणाला की, मांजरीसोबत त्याला असा व्यवहार करायला नको होता. तो म्हणाला की, मांजरीबाबत त्यांच्या भावना चुकीच्या होत्या. पण तो यामुळे चिंतेत होता की, एका मांजरीला गर्लफ्रेन्डच्या जीवनात जास्त महत्व आहे.
तरूणीच्या पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काही लोक तिच्या मांजरीवरील प्रेमाचं कौतुक करत आहेत. काही लोक म्हणाले की, तिने बॉयफ्रेन्डवर विश्वास ठेवू नये.