अद्भूत! Pompeii या प्राचीन शहरात सापडला 'प्रेमाच्या देवतेचा' २ हजार वर्ष जुना रथ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:35 AM 2021-03-03T10:35:33+5:30 2021-03-03T10:44:47+5:30
पॉम्पेई शहराच्या उत्तरेला प्राचीन पॉम्पेई शहराच्या भींतीला लागून असलेल्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या खोदकामावेळी प्रेमाचा देव इरोसचा हा रथ सापडला आहे. असं मानलं जातं की, हा रथ चार घोडे खेचत होते. इटलीच्या दक्षिण भागात ऐतिहासिक पॉम्पेई शहरात प्रेमाच्या देवतेचा रथ सापडला आहे. हा रथ साधारण २ हजार वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. चार चाकी या रथावर प्रेमाच्या देवतेची मूर्ती काढली आहे. लोखंड, तांबे आणि लाकडापासून तयार हा रथ आजही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. चला जाणून घेऊ या अनोख्या रथाबाबत....
पॉम्पेई शहराच्या उत्तरेला प्राचीन पॉम्पेई शहराच्या भींतीला लागून असलेल्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या खोदकामावेळी प्रेमाचा देव इरोसचा हा रथ सापडला आहे. असं मानलं जातं की, हा रथ चार घोडे खेचत होते.
या रथाची दोरी, फुलांनी केलेली सजावट यावरून अनेक गोष्टी समोर येतात. पॉम्पेईचं उपनगर सिविटा जियुलियानातील भव्य घराच्या आत हा रथ सापडला. याच घरात २०१८ मध्ये तीन घोड्यांचे अवशेष सापडले होते. असं मानलं जातं की, हेच घोडे हा ऱथ खेचत होते.
पुरातत्ववाद्यांचं मत आहे की, जीर्ण झालेल्या या घराच्या आत दबलेल्या या रथाची चोरी न होण्याचं कारण म्हणजे हे घर कुणावरही कधीही पडू शकलं असतं. या ठिकाणी प्राचीन वस्तू चोरी करण्यासाठी चोरांनी भुयारही तयार केला होता. हा भुयारी मार्ग रथापर्यंत पोहोचला होता. पण चोरांना यश मिळालं नाही.
इटलीचं कल्चरल सेंटल हेरिटेज मिनिस्ट्रीनुसार, हे ठिकाण आर्किओलॉजिकल पार्क ऑफ पॉम्पेईच्या अख्त्यारित येतं. पुरातत्ववाद्यांचं मत आहे की, या रथाचा वापर पिलेंटम म्हणून केला जात होता.
पिलेंटम म्हणजे असा रथ ज्याचा वापर शेतीचे साहित्य वाहून नेण्यासाठी केला जात होता. पण यात प्रेमाच्या देवतेच्या मूर्ती आणि निशाण असल्याने वाटतं की, याचा वापर धार्मिक यात्रा, परेड यासाठी केला जात असावा.
यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्समध्ये इतिहासाचे असोसिएट प्रोफेसर असलेले एरिक पोहेलर म्हणाले की, ते या रथाबाबत समजल्यावर हैराण आहेत. हा रथ त्या काळातील लॅम्बोर्गिनी होता. कारण या रथाला चार घोडे खेचत होते. ही त्या काळातील सर्वात फॅन्सी कार होती.
vआर्कियोलॉजिकल पार्क ऑफ पॉम्पेईचे डायरेक्टर मासिमो ओसाना म्हणाले की, हा एक अद्भूत शोध आहे. याने आम्हाला पॉम्पेईचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यास मदत होईल.