Gold cum mask necklace bride women girls fashion marriage coronavirus covid 19 pune jeweller
खास बनावटीच्या सोन्याच्या मास्कला मागणी वाढली; पुण्याच्या नेकलेस मास्कची खासियत न्यारी By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:42 AM2020-07-15T11:42:41+5:302020-07-15T11:59:24+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या माहामारीत आता मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. कारण मास्कचा वापर न केल्यास संसर्गाची भीती असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. लग्न समारंभासाठी खास बनावटीच्या मास्कची मागणी वाढलेली आहे. पुण्याच्या रांका ज्वेलर्सने लग्न समारंभाासाठी नववधूसाठी एक खास मास्क तयार केला आहे. १२४ ग्राम सोन्याच्या मास्कची किंमत ६.५ लाख रुपये इतकी आहे. कोरोना काळात या मास्कला नेकलेसप्रमाणे वापरता येऊ शकते. या मास्क कम नेकलेसला एन ९५ मास्कवर शिवून तयार केले आहे. २५ दिवसांनी या मास्कला धुवून पुन्हा एकदा वापरता येऊ शकते. विशेष म्हणजे या मास्कचा वापर केल्यानंतर सोप्या पद्धतीने बदलताही येऊ शकते. आतील मास्क खराब झाल्यानंतर मास्क बदलता येऊ शकतो. हा मास्क तयार करण्यासाठी २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागला होता. हा मास्क तयार करण्यासाठी तुर्कस्थानवरून डाय मागवण्यात आली होती. रांका ज्वेलर्सने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी नवरा आणि नवरीसाठी हे खास बनावटीचे मास्क तयार केले आहेत. महिलांची या सोन्याच्या मास्कला खूप पसंती मिळाली आहे. याआधी सुद्धा सुरतच्या एका ज्वेलरी शॉपच्या मालकाने हिरेजडीत मास्क तयार केला होता. त्याची किंमत दिड लाख रुपये ते चार लाख रुपये इतकी होती. पुण्यातील शंकर कुराडे नावाच्या व्यक्तीने कोरोनाच्या माहामारीत २,८९ लाखांचा सोन्याचा मास्क तयार केला होता. Read in Englishटॅग्स :जरा हटकेपुणेJara hatkePune