Habits that are holding you back from being rich and successful
'या' सवयी सोडाल तर यशस्वी होण्याचा मार्ग होईल मोकळा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:54 PM2019-03-18T16:54:02+5:302019-03-18T17:06:13+5:30Join usJoin usNext प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपण आयुष्यात फार यशस्वी आणि श्रीमंत व्हावं. पण पैसा कमावणे आणि यशस्वी होणे यासाठी कोणताही चावी नसते. त्यासाठी मेहनत करावी लागते. इतकेच नाही तर काही सवयी सुद्धा बदलाव्या लागतात. जर तुम्हाला पैशांसोबतच यशस्वी व्हायचं असेल तर खालील काही सवयी सोडा. (Image Credit : oneshrinksperspective.com) स्वत:वर शंका - स्वत:वर शंका म्हणजेच सेल्फ डाउट स्वप्नांना तडे देण्यासारखं असतं. त्यामुळे कधीही स्वत:वर संशय घेऊ नका. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. सेल्फ डाउट दूर करा आणि स्वप्ने बघायला सुरूवात करा. (Image Credit : www.businessinsider.in) योग्य वेळेची वाट - हे लक्षात ठेवा की, योग्य वेळ अशी काही गोष्ट नसते. जी वेळ तुम्ही जगताय तिच योग्य वेळ आहे. तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. पण कधीही तुम्हाला करायचं आहे ते काम करण्यापासून स्वत:ला रोखू नका. (Image Credit : freepik.com) वाचण्याची सवय नसणे - काहीतरी शिकत राहणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. जे यशस्वी असतात ते फार वाचतात. जेणेकरून जगातील गोष्टी कळाव्या. त्यातून ते नवीन गोष्टी शिकत असतात. (Image Credit : Business Insider) जे बोलतात ते करत नाहीत - तुम्ही जोपर्यंत काही तोडगा काढत नाहीत तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला केवळ विचार करून चालणार नाही. जे तुम्ही प्लॅन केलंय त्याची सुरूवात करावी लागेल. (Image Credit : www.inc.com) लक्ष्य न ठरवणे - तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. त्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. व्यवस्थित सगळं ठरवलं तर तुम्हाला कामे सोपी होतील. (Image Credit : NBT) हट्टी नसणे - असं करण्याच्या दोन पद्धती असतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामाप्रति जरा हट्टीपणा करावा लागेल. न थकता, न हरता तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करावं लागेल. (Image Credit : NBT)टॅग्स :नोकरीव्यवसायप्रेरणादायक गोष्टीjobbusinessInspirational Stories