ही आहे जगातली सर्वात मोठी गुहा, इतकी मोठी की आत उभारली जाऊ शकते ४० मजली इमारत... By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:22 AM 2021-01-25T11:22:58+5:30 2021-01-25T11:31:07+5:30
ऑक्सालिस ट्रॅव्हल कंपनी द्वारे ही गुहा चालवली जाते. त्यांच्यानुसार, हॅंग सन डूंग गुहा जगातली सर्वात मोठी गुहा आहे. ही गुहा इतकी विशाल आहे की, यात ४० मजली इमारत उभारली जाऊ शकते. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या गुहा आकर्षणाचं केंद्र राहिल्या आहेत. तुम्ही सुद्धा काही लहान-मोठ्या गुहा पाहिल्या असतील. पण जगात एक अशी गुहा आहे ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही गुहा इतकी मोठी आहे की, यात ८ ते १० नाही तर ४० मजली इमारत उभारली जाऊ शकते. चला जाणून घेऊ व्हिएतनामधील हॅंग सन डूंग गुहेबाबतचं रहस्य...
ही अनोखी गुहा मध्य व्हिएतनामच्या जंगलात आहे. या गुहेला 'हॅंग सन डूंग' नावाने ओळखलं जातं. सन डूंग गुहा जंगलाच्या मधोमध आहे. ही गुहा ८ वर्षांआधी जनतेला बघण्यासाठी उघडण्यात आली. असे मानले जाते की, गुहा लाखो वर्ष जुनी आहे. सोबतच ही गुहा इतकी मोठी आहे की, यात ४० मजली इमारत उभारली जाऊ शकते.
हॅंग सन डूंग गुहेत १५० गुहा आहेत. या अद्भूत गुहेची लांबी ९ किलोमीटर आहे. सन डूंग गुहा बघण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. स्थानिक लोकांनुसार, या गुहेचं आपलं इको सिस्टीम आणि पॅटर्न आहे. जे बाहेरील जगापेक्षा वेगळं आहे.
हॅंग सन डूंग गुहा ८ वर्षांआधी लोकांसाठी खुली करण्यात आली होती. या गुहेत उडणारे कोल्हे राहतात ज्यांच्यापासून पर्यटकांना सावधान रहावं लागतं.
हॅंग सन डूंग गुहा आजपासून २९ वर्षाआधी एक स्थानिक निवासी हो खान याने शोधली होती. १९९१ मध्ये हो खान चून्याचा डोंगर फोडत होता. तेव्हाच त्याला अचानक नदीचा आवाज आला.
१८ वर्षानंतर हो खान ब्रिटीशन वैज्ञानिकांच्या एका टीमसोबत गुहेत पोहोचला. संशोधकांनी सांगितले की, ही जगातली सर्वात मोठी गुहा आहे.
ऑक्सालिस ट्रॅव्हल कंपनी द्वारे ही गुहा चालवली जाते. त्यांच्यानुसार, हॅंग सन डूंग गुहा जगातली सर्वात मोठी गुहा आहे. ही गुहा इतकी विशाल आहे की, यात ४० मजली इमारत उभारली जाऊ शकते.