'तिच्या'साठी काय पण! 2 मुलांची आई पडली तरुणीच्या प्रेमात; म्हणाली, "साथ जिएंगे, साथ मरेंगे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:31 AM2023-02-13T10:31:38+5:302023-02-13T10:42:27+5:30

दोन मुलांची आई आणि मुलीच्या प्रेमकथेने नातेवाईकांसह पोलिसांचीही झोप उडवली आहे.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. काही जण प्रेमासाठी आपलं घरदार देखील सोडतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. दोन मुलांची आई एका अविवाहित मुलीच्या प्रेमात पडल्याची घटना घडली आहे.

सामाजिक बंधने झुगारून दोघीही घरातून पळून गेल्या. हरवल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपासाअंती धक्कादायक खुलासा केला. विवाहित महिला आपल्या पतीला सोडून मुलीसोबत राहण्यावर ठाम होती. तर मुलीने प्रेमासाठी लिंग महत्त्वाचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

हरदा सिटी कोतवाली परिसरात 5 फेब्रुवारी 2023 रोजी बेपत्ता मुलगी आणि विवाहित महिलेच्या प्रकरणात मोठा आणि नवा ट्विस्ट आला आहे. दोघींच्या शोधात गुंतलेल्या हरदा पोलिसांनी तरुणी व महिलेला इटारसी येथून सिटी कोतवाली येथे नेले. दोघींनी पोलिसांसमोर एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितलं. (फोटो: प्रवीण तंवर/न्‍यूज 18 हिंदी)

दोघींचे म्हणणे आहे की, आम्ही एकत्र जगणार तर एकत्रच मरणार. घरच्यांनी समजावल्यानंतरही दोघीही मान्य करत नव्हत्या. दोघेही प्रौढ आहेत, त्यांनी कोणताही निर्णय घ्यावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दोघींनाही कुटुंबीय समजावत आहेत.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात वयाचं बंधन दिसत नाही, मात्र हरदा येथील प्रेमाच्या एका अजब प्रकरणाने सर्वच जण हैराण झाले आहेत. दोन मुलांची आई आणि मुलीच्या प्रेमकथेने नातेवाईकांसह पोलिसांचीही झोप उडवली आहे. (फोटो: प्रवीण तंवर/न्‍यूज 18 हिंदी)

दोघीही एकमेकांसोबत राहण्यावर ठाम आहेत. नातेवाईकांनी समजावले, विनवणीही केली, पण दोघीही आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2023 रोजी कृषी मंडईमध्ये मुस्लिम समाजाच्या सामूहिक विवाह परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

घरमालकाची मुलगी पहाटे एकच्या सुमारास स्कूटीवर आली आणि विवाहितेला घेऊन गेली. या दोघींनी लहान मुलीला 100 रुपये दिले आणि आमच्या मागे येऊ नको असे सांगितले. मुलीने सांगितले की, आम्ही दोघी एकमेकांवर प्रेम करतो आणि एकत्र राहण्याची इच्छा आहे. (फोटो: प्रवीण तंवर/न्‍यूज 18 हिंदी)

महिलेचे कुटुंबीय 2 मुले असल्याने विरोध करत आहेत. विवाहित महिलेला कुटुंबासोबत राहायचे नाही. तिचे प्रेम खरे असल्याचे ते म्हणते. विवाहित महिलेने तिला मुलं किंवा कुटुंब नको आहे. तिला फक्त तरुणीसोबत राहायचं असल्याचं म्हटलं आहे.

सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे टीआय अनिल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांनी मुलगी आणि विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोघेही स्कूटीने कुठेतरी गेल्या होत्या. (फोटो: प्रवीण तंवर/न्‍यूज 18 हिंदी)

नर्मदा पुरम येथील इटारसीजवळ त्यांच्या मोबाईलचे लोकेशन सापडले. चौकशीत तरुणी आणि विवाहितेने सांगितले की, दोघींना एकत्र राहायचे आहे. त्यांना समजावले जात आहे, पण दोघीही एकत्र जगणे आणि मरणे याविषयी बोलताना दिसतात.

युवती आणि विवाहित महिला बसस्थानक परिसरातील रहिवासी आहेत. चार महिन्यांपूर्वी एक विवाहित महिला पती आणि दोन मुलांसह भाड्याने मुलीच्या घरी राहायला गेली होती. मुलीची वागणूक मुलासारखी असते. दरम्यान, महिला आणि तरुणीमध्ये प्रेम फुलले. त्य़ा एकमेकांवर प्रेम करू लागल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (फोटो: प्रवीण तंवर/न्‍यूज 18 हिंदी)