Hardworking navalben earns crores by animal husbandry milk production banaskantha gujarat
कमाल! 2020 मध्ये फक्त दूध विकून 'ती' बनली करोडपती; दर महिन्याला कमावतेय साडे ३ लाख By manali.bagul | Published: January 7, 2021 12:36 PM2021-01-07T12:36:25+5:302021-01-07T12:47:42+5:30Join usJoin usNext कोणतंही काम लहान नसतं असं म्हणतात. कामाचा कोणताही धर्म नसतो. हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. गेल्या अनेक वर्षात २०२० मध्ये लोकांना आपली नोकरी गमावली. त्याच्याकडे कोणताही कामधंदा हाताशी नव्हता. त्यावेळी बनासकंठा जिल्ह्यातील महिला नवलबेन यांनी एका याच संधीचे सोनं करत एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे. ६२ वर्षीय नवलबेन यांनी स्वतःच्या पायावर उभं राहत पशूपालन आणि दूध उत्पादन करून रेकॉर्ड बनवला आहे. २०२०मध्ये नवलबेन यांनी १ कोटी १० लाख रुपयांचे दूध विकून एक आदर्श गावापुढे ठेवला आहे. गुजराच्या बनासकांठा जिल्ह्यातील नगाना गावातील नबलबेन यांनी कमी पैश्यात पशुपालनाला सुरूवात केली. त्यांच्याकडे आज ८० म्हशी आणि ४५ गायी आहेत. म्हणूनच रोज १०० लीटर दूध मिळते. नवलबेन दूध विकून महिन्याला ३ लाख ५० हजार रुपये कमावतात. त्यांची गावात एक डेअरी आहे. ११ लोकांना या डेअरीच्या माध्यमातून रोजगार मिळतो. नवलबेन यांची ४ मुलं आहेत. शहरात शिक्षण घेण्याचे काम करतात.Read in Englishटॅग्स :जरा हटकेJara hatke