हे आहे जगातील 'हाँटेड थीम पार्क', इथं ऐकू येतात चित्रविचित्र आवाज; असं काय घडलं होतं इथे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 06:21 PM2021-10-01T18:21:00+5:302021-10-01T18:36:48+5:30

एके काळी अमेरिकेतल्या या प्रसिद्ध थीम पार्कमध्ये लहान मुलांचं बागडणं, तरुणाईचा हल्लागुल्ला, गप्पा ऐकू यायच्या. गर्दीने बहरलेलं हे पार्क आता ओस पडलंय आणि चित्रविचित्र आवाज इथे ऐकू येतात म्हणे. नेमकं असं काय घडलं होतं तिथे? पाहा PHOTOS

अमेरिकेतलं six flags amusement park हे एके काळी प्रसिद्ध थीम पार्क होतं. 146 एकर जागेत पसरलेलं हे पार्क म्हणजे आनंद जत्रा होती. आता मात्र हे पार्क बंद पडलंय. या झपाटलेल्या ठिकाणी येण्यास लोक घाबरतात.

2005 मध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाने (Hurricane Katrina) या थीम पार्कचा पूर्णपणे विनाश केला. तेव्हापासून हे उद्यान बंद आहे.

या घटनेला 16 वर्षं झाली आहेत. तरीदेखील त्या दुर्दैवी घटनेच्या पाऊलखुणा अजूनही तशाच आहेत.

जेव्हा वादळ आलं तेव्हा या उद्यानात हजारो लोक आनंदाने बागडत होती. या चक्रीवादळात 1800 लोकांना आपला जीव गमवावा लागला. न्यू ऑर्लियॉन्स परिसरात 4 लाखांहून अधिक लोक बेघर व्हावं लागलं.

आता या उद्यानाची गणना जगातील सर्वाधिक झपाटलेल्या उद्यानांमध्ये केली जाते. असे म्हटलं जातं की, वादळात मरण पावलेल्यांचा आत्मा इथं भटकत असतो.

जो कोणी इथे येतो त्याला नेहमी वाटतं की कोणीतरी त्याला बघत आहे. लोकांनी अनेकदा या ठिकाणाहून विचित्र आवाज ऐकले असल्याचं सांगितलं जातं.

जेव्हा या ठिकाणी वादळ आलं होतं तेव्हा या पार्कचं अतोनात नुकसान झालं होतं. सगळे गेम, खेळणी उखडली गेली. वादळामध्ये जीव गमावलेल्यांच्या खाणाखुणाही इथे आहेत.

मळलेली टेडी बेअर, तुटलेली मूर्ती, वादळात नष्ट झालेल्या साहित्यांचे तुकडे पाहून एखाद्याचा आत्मा थरथरेल. असंच चित्र सध्या या पार्कमध्ये आहे.

लोकांना या पार्कमध्ये अनेक विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यामुळे हे पार्क अद्याप बंदच आहे. वादळानंतरची इथली शांतता कुणालाही घाबरवू शकते.

अमेरिकेतली Most Haunted Place असं या बंद पडलेल्या पार्कचं वर्णन केलं जातं.