उठाबशा काढणं ही शिक्षा नव्हे आहेत त्याचे चकित करणारे फायदे, घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:53 PM 2021-12-22T18:53:07+5:30 2021-12-22T19:10:10+5:30
शाळेतील नियम मोडले, दंगा केला, गृहपाठ नाही केला, तर शिक्षक शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना कान पकडून उठाबशा (Uthak baithak punishment in schools) काढण्यास सांगतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ही शिक्षा नाही, तर एक व्यायाम प्रकार असून याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. कान पकडून उठाबशा काढण्यामागे एक मनोरंजक वैज्ञानिक कारण (Scientific Reason) आहे. शाळेत असताना तुम्ही कधी उठबशा (Sit ups Punishment In Schools) काढल्या आहेत का, असा प्रश्न एखाद्याला विचारल्यास उत्तर हो असेच येईल. शाळेतील नियम मोडले, दंगा केला, गृहपाठ नाही केला, तर शिक्षक शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना कान पकडून उठाबशा (Uthak baithak punishment in schools) काढण्यास सांगतात.
उठाबशा या शिक्षेवर गेल्या काही दशकात अनेक संशोधनं झाली आहेत. उठाबशा काढणं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचं विविध संशोधनांतून दिसून आलं आहे.
कान पकडून उठाबशा काढण्यामुळे लक्ष केंद्रीत होते आणि स्मरणशक्ती (Memory) वाढते. मेंदूचे अनेक भाग सक्रिय होतात. यामुळे सतर्कता, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते.
त्यामुळे शिक्षा म्हणून मुलांना उठबशा काढण्यास सांगितले जाते. याचा थेट फायदा मुलांना शिक्षणात होतो. मुलांची मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांची मेंदू प्रखर करण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही सुपर ब्रेन योगा (Super Brain Yoga) करवून घेऊ शकता.
संशोधनात दिसून आलं की केवळ एका मिनिटासाठी कान पकडून उठाबशा काढल्यामुळे अल्फा तरंग (alpha waves) सक्रिय होतात. कान पकडून उठबशा काढताना कानांवर दाब पडतो. यामुळे मेंदूच्या काही पेशी सक्रीय होतात.
अक्युप्रेशर पडल्याने पिट्यूटरी ग्रंथी (pituitary gland) सक्रिय होतात. या शिक्षेमुळे मेंदू अधिक तल्लख होतो.
प्रत्येकाला बुद्धी तल्लख व स्मरणशक्ती मजबूत असावी असे वाटते. आपली स्मरणशक्ती बळकट करण्यासाठी तुम्ही उठाबशा हा व्यायाम करू शकता.
सध्या कोरोनाच्या काळात तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यास घरच्याघरी व्यायाम करण्यातील एक व्यायाम प्रकार म्हणजे उठाबशा आहेत.
दररोज उठाबशा काढल्याने आपलं स्वास्थ उत्तम राहू शकतं. लॉकडाऊनमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करत विनाकारण घराबाहेर पडणार्या तरुणांना पोलिसांनी उठाबशांची शिक्षा दिल्याचे अनेकदा पाहायला मिळाले.
कान पकडून उठाबशा काढणं यात खंड पडू देऊ नका. कारण दररोज उठबशा काढल्या नाही, तर त्याचा फायदा होत नाही. दररोज उठाबशा न काढल्यास त्याचे फायदे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात.