'ही' ठिकाणं म्हणजे जमिनीखालील स्वर्गच! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 04:09 PM 2018-05-14T16:09:17+5:30 2018-05-14T16:09:17+5:30
ओजार्क्स कावेर्न्स, अमेरिका: 1880 मध्ये या जागेचा शोध लागला. एंजल शॉवर्स या नावानं ही गुहा जगप्रसिद्ध आहे. या गुहेच्या छतावरुन पाण्याच्या धारा केस्लाईटनं तयार झालेल्या बाथटबसारख्या आकृतीत पडताना दिसतात. निसर्गानं तयार केलेला बाथटब असं या जागेचं वर्णन करता येऊ शकतं.
सलीना तुरडा, रोमानिया: ट्रान्सिलवानिया जवळ असलेली ही मिठाची खाण 1992 मध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. तेव्हापासून 20 लाख लोकांनी या जागेला भेट दिली आहे.
स्प्रिंग्ब्रुक पार्क येथील नॅचरल ब्रिज, ऑस्ट्रेलिया: क्विन्सलँडमधील ब्रिस्बेनपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेला हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. एका गुहेच्या छताला भेदत याठिकाणी झरा खाली येताना दिसतो.
वाइटोमो ग्लोवॉर्म गुहा, न्यूझीलंड: न्यूझीलंडच्या उत्तरेकडील बेटांवर असणारी ही गुहा एका विशिष्ट प्रकारच्या चमकणाऱ्या फंगसमुळे प्रसिद्ध आहे. ग्लोवार्म नावानं ओळखली जाणारी ही फंगस फक्त न्यूझीलंडमध्ये आढळते. या फंगसमुळे संपूर्ण गुहा उजळून निघते.
प्यूर्टो प्रिन्सेसामधील भूमिगत नदी, फिलिपीन्स: ही जगातील सर्वात लांब भूमिगत नदी आहे. बोटीतून या नदीचा फेरफटका मारता येतो. 2012 या नदीचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये करण्यात आला.