ही आहेत प्राण्यांची काही हटके वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:12 IST2019-09-11T22:54:09+5:302019-09-11T23:12:34+5:30

निसर्गात वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे काही खास अशी वैशिष्ट्ये असतात. ही वैशिष्ट्ये त्या प्राण्यांना वेगळी बनवत असतात. अशाच काही प्राण्यांचा घेतलेला हा आढावा.

जगातील कुठलाही प्राणी चित्त्यापेक्षा वेगाने धावू शकत नाही. चित्ता हा ताशी १२० किमी वेगाने धावू शकतो.

सतत वेगाने धावण्यामध्ये अमेरिकी हरिणाची बरोबरी कुणी करू शकत नाही. हे हरीण सलग पाच किमीपर्यंत ६० ते ७० किमी वेगाने धावू शकते.

शहामृग हा पक्षीसुद्धा वेगाने पळण्यासाठी विख्यात आहे. शहामृग ७० किमी प्रतितास वेगाने धावू शकतो. हा पक्षी अर्घ्यातासापर्यंत ५० किमी वेगाने धावू शकतो.

हे गिघाड सर्वात उंचावर उडणारे गिधाड म्हणून नोंद झालेली आहे. १९७३ मध्ये एक रुएपल गिधाड ११ हजार मीटर उंचीवर उडत असताना एका विमानावर आदळले होते.

प्युमा सर्वात लांब उडी मारू शकतो. ५० किलो वजनाचा प्युमा जमिनीपासून सुमारे ५ मीटर उंच उडी मारू शकतो.

जगातील सर्वात छोटा पक्षी म्हणून हमिंग बर्ड ओळखले जाते.