history of sikkim and best tourist place in sikkim
भारतातलं 'हे' ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षाही कमी नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 04:04 PM2018-05-16T16:04:42+5:302018-05-16T16:04:42+5:30Join usJoin usNext नाथुला: 14 हजार 200 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण भारत-चीन सीमेवर आहे. या भागात केलेला कोणताही प्रवास म्हणजे जणू आनंदयात्रा असते. धुक्यात बुडालेले डोंगर, नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता, अधूनमधून दिसणारे झरे असं मनमोहक दृश्य याठिकाणी पाहायला मिळतं. पेलिंग : हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून वेगानं प्रसिद्ध होतंय. 6 हजार 800 फुटांवर असलेल्या पेलिंगवरुन जगातील तिसरं सर्वाधिक उंच शिखर कांचनगंगा पाहता येतं. सिक्कीम रिसर्च: तिबेटबद्दलचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ही राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाची संस्था आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ, प्राचीन पुस्तकं या ठिकाणी आहेत. या वास्तूची रचनादेखील अतिशय सुंदर आहे. युक्सोम: या भागात आधी सिक्कीमची राजधानी होती. सिक्कीमचा इतिहास याच भागातून सुरू होत असल्यानं हे स्थान अतिशय पवित्र समजलं जातं. प्रसिद्ध शिखर कांचनगंगावर चढाईसाठी येथूनच सुरुवात केली जाते. सोम्गो लेक: अंडाकार आकाराचं आणि एक किलोमीटर परिसरात पसरलेलं हे तलाव अतिशय पवित्र मानलं जातं. मे ते ऑगस्ट दरम्यान येथील दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं. या भागात अतिशय दुर्मिळ फुलंदेखील पाहायला मिळतात. टॅग्स :जरा हटकेJara hatke