Holi 2019 : colourful pictures of traditional lathmar holi 2019 from barsana in mathura
Holi 2019 : 'लाठीमार होळी'...महिला लाठीने पुरुषांना मारतात By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:42 PM2019-03-19T17:42:07+5:302019-03-19T17:53:44+5:30Join usJoin usNext राधानगरी बरसनामध्ये होळी-रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी 16 मार्चला 'लाठीमार होळी' साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'लाठीमार होळी'चा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक आले होते. या 'लाठीमार होळी'त सप्तरंगांची उधळण करत महिला आपल्या हातातील लाठीने पुरुषांना मारतात आणि पुरुष ढालीच्या मदतीने स्वत:चे रक्षण करतात. मथुरा, वृंदावन बरसाना या प्रदेशात होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात केला जातो. यानिमित्त कृष्ण जन्मभूमीमध्ये राधा आणि कृष्णाचा जयघोष केला जातो. लाठी होळी खेळण्याआधी परिसरातील मंचावर कलाकार आपल्या कलेच सादरीकरण करतात. सादरीकरणानंतर राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील कलाकार याठिकाणी नागरिकांसोबत फुलांद्वारे बनविलेल्या रंगाने होळी खेळतात. टॅग्स :होळीHoli