शी जिनपिंगच्या छोट्या भावाच्या पत्नीला चीनची मर्लिन मुनरो का म्हटलं जातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:02 PM2020-06-01T16:02:57+5:302020-06-01T16:08:28+5:30

शी जिनपिंग यांच्या भावाचं नाव आहे युआनपिंग. त्याचं लग्न ज्या गायिकेसोबत झालं त्या गायिकेचं नाव आहे झांग लानलान.

2008 मध्ये चीनची एक लोकप्रिय गायिका अचानक लोकांच्या नजरेसमोरून गायब झाली होती. नंतर तब्बल 6 वर्षांनी अचानक ती पुन्हा लोकांसमोर आली होती. पण ती परतली तेव्हा केवळ एक लोकप्रिय गायिका नव्हती तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भावाची पत्नी झाली होती. चीनच्या एका स्थानिक वृत्तपत्राने ही बातमी झापली होती. त्यानंतर पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी ती छापली.

शी जिनपिंग यांच्या भावाचं नाव आहे युआनपिंग. त्याचं लग्न ज्या गायिकेसोबत झालं त्या गायिकेचं नाव आहे झांग लानलान. जेव्हा झांग 2014 मध्ये पुन्हा परत आली तेव्हा शी युआपिंगने एक स्टेटमेंट दिलं होतं की, त्यांनी 2008 मध्येच लग्न गेलं होतं.

पण काही वेळात चीनच्या वेबसाइट्सवरून हे स्टेटमेंट डिलीट करण्यात आलं होतं. शी जिनपिंगने त्यावेळी स्टेटमेंट दिलं होतं की, झांग एक सामान्य आणि गंभीर महिला आहे. ती एक चांगली सूनही आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शी जिनपिंग हे स्वत: गायक होते.

चीनच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या झांगने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी चीनी आर्मीचा म्युझिकल ग्रुप जॉइन केला होता. 2000च्या सुरूवातीच्या काळात ती इतकी लोकप्रिय झाली होती की, चीनी आर्मीच्या पार्ट्यांमध्ये होस्टेस म्हणून सहभागी होऊ लागली. तिची गाणी सुपरहिट झाली होती.

झांगला तिच्या सुंदरतेमुळे चीनची मर्लिन मुन्रोही म्हटलं जातं. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलंय. 2008 मध्ये ती एका मोठ्या कार्यक्रमात दिसली आणि त्यानंतर अचानक गायब झाली होती.

झांगबाबत असं सांगितलं जातं की, तिचं अफेअर एका मोठे अधिकारी जू शायहूसोबत होतं आणि या कारणानेच ती गायब झाली होती. जेव्हा मीडियात यावरून छापून आलं तेव्हा चीनच्या सरकारी प्रेस विभागाने झांगसंबंधी कोणतीही बातमी छापण्यावर बंदी घातली.

त्यानंतर सहा वर्षे झांगचा काही पत्ता नव्हाता. मीडियानेही काही प्रकाशित केलं नाही नंतर 2014 मध्ये शी जिनपिंगच्या भावाचं एक पत्र चीनी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालं.

या पत्रात सांगण्यात आले होते की, त्यांनी झांगसोबत लग्न केलं आणि दोघांना एक बाळही आहे. नंतर समोर आलं की, दोघांचं 2005 पासून अफेअर होतं. पण लोकांपासून हे लपवण्यात आलं होतं. तसंही चीनमध्ये नेत्यांचं जीवन सीक्रेट ठेवण्याचं चलन आहे.

इथे शक्तीशाली नेत्यांचं जीवन लोकशाही देशातील नेत्यांपेक्षा वेगळं असतं. जर शी जिनपिंग यांच्याबाबत सांगायचं तर त्यांना एक मुलगी आहे. ती सुद्धा मीडियाच्या नजरेपासून दूर असते. तिने हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलंय.