भीतीचा वास घेणं शक्य पण, फक्त महिलांनाच, रिसर्चमधुन आणखीही धक्कादायक दावे... By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:58 PM 2021-09-19T15:58:08+5:30 2021-09-19T16:26:45+5:30
स्त्रीलाच मुळात शक्ती म्हटलं जातं. निर्सगाने स्त्रीला अनेक शक्ती बहाल केल्या आहेत. त्यातच आता एक नवी शक्ती स्त्रियांमध्ये असल्याचं समोर आलंय. संशोधन म्हणतंय की आता भीतीचाही वास घेता येणार पण फक्त स्त्रियांनाच...कसा? वाचा पुढे प्रत्येक व्यक्तीला काही प्रमाणात भीती ही वाटतेच. तुम्ही भीतीबद्दल अनेक गोष्टी आतापर्यंत ऐकल्या असतील. अशा परिस्थितीत, एक प्रश्न उद्भवतो की 'भीती'चा वास घेता येतो किंवा जाणवता येतो का?
एका संशोधनात सापडलं आहे. या अभ्यासाच्या परिणामांनुसार, भीतीचा वास घेणं शक्य आहे, परंतु जर एखादी स्त्री असेल तरच हे घडू शकतं.
या संशोधनात २१४ व्यक्तींचा समावेश होता. ज्यात पुरुष आणि महिलाही होत्या प्रत्येकाला मास्कच्या साहाय्याने घामाच्या नमुन्यांचा वास घ्यायचा होता.
वैज्ञानिकांनी निरीक्षण केल्यानंतर असं दिसून आले की, भीतीने त्रासलेल्या लोकांचा वास जाणवल्यानंतर महिलांचं वर्तन आश्चर्यकारकपणे बदललं.
मानसशास्त्रज्ञांनी या कामासाठी सभागृहात सार्वजनिक भाषण ऐकणाऱ्या लोकांसह क्रीडांगणात उपस्थित असलेल्या लोकांच्या घामाचे नमुने गोळा केले होते.
या प्रक्रियेदरम्यान महिलांना खेळ खेळण्यास देखील सांगण्यात आलं होतं.
हेनरिक हेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं की, अभ्यासाचे परिणाम महिलांच्या सामाजिक विकासाद्वारे देखील समजू शकतात.
उदाहरणार्थ, चिंताग्रस्त व्यक्तीच्या घामाचा वास घेतल्यानंतर स्त्रिया विश्वासु गोष्टींवर कमी विश्वास ठेवतात
अशावेळी स्त्रिया अधिक जोखीम घेण्याचा प्रयत्न करतात.
सामान्य परिस्थितीत मात्र स्त्रिया अशा विचित्र वागत नाहीत.