बोंंबला! पत्नीसोबत भांडल्यावर रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला, पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 03:55 PM 2020-12-08T15:55:08+5:30 2020-12-08T16:06:43+5:30
इटलीतील वृत्तपत्र il Resto Del Carlino मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॉर्थ इटलीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पत्नीसोबत भांडण केल्यावर ४५० किलोमीटर पायी चालत आपला राग शांत केला. जवळपास प्रत्येक व्यक्तीला राग येतो. पण या रागामुळेच ते आपलं नुकसान करून घेतात. राग शांत करण्याच्याही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ट्रिक असतात. कुणी आवडती गाणी ऐकतं तर कुणी आवडतं काम करत बसतं. इटलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला जेव्हा राग यायचा तेव्हा तो वॉक करू लागत होता. याच ट्रिकमुळे तो आज फेमस झाला आहे. आपल्या पत्नीसोबत भांडून ही व्यक्ती घरातून बाहेर पडली. ही व्यक्ती इतकी रागात होती की, त्याला हेच कळालंच नाही की, तो रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला. त्याला हे तेव्हा समजलं जेव्हा त्याला पोलिसांनी अडवलं. पण यानंतर त्याला घरी नाही तर तुरूंगात पाठवण्यात आलं.
इटलीतील वृत्तपत्र il Resto Del Carlino मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॉर्थ इटलीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पत्नीसोबत भांडण केल्यावर ४५० किलोमीटर पायी चालत आपला राग शांत केला.
या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, या ४८ वर्षीय व्यक्तीला जेव्हा राग येत होता तेव्हा तो हा राग पायी चालूनच शांत करत होता. अशात अचानक त्याचा काही कारणावरून पत्नीसोबत वाद झाला.
या भांडणामुळे राग आल्याने ही व्यक्ती रागात ४५० किलोमीटर पायी चालली. त्याला हे जाणवलं नाही की, तो किती दिवसांपासून पायी चालतोय.
आता पोलिसांनी या व्यक्तीवर कर्फ्यू तोडण्याच्या आरोपाखाली ३६ हजार दंड ठोठावला आहे. त्याला सध्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
अशात या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी रस्त्यावर चालताना पाहिले तेव्हा कुठे जातोय विचारले. त्याने सांगितले की, तो पत्नीसोबतच्या भांडणानंतर आलेला राग वॉक करून शांत करतोय.
जेव्हा पोलिसांनी आणखी चौकशी केली तर समजले की, ही व्यक्ती ४५० किलोमीटर पायी चालली आहे. त्याच्या पत्नीने पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
आता पोलिसांनी या व्यक्तीवर कर्फ्यू तोडण्याच्या आरोपाखाली ३६ हजार दंड ठोठावला आहे. त्याला सध्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.