incomparable pink diamond could smash record at geneva auction
सर्वाधिक बोली लागलेला दुर्मीळ हिरा By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 07:24 PM2018-11-14T19:24:15+5:302018-11-14T19:30:10+5:30Join usJoin usNext स्वीत्झर्लंडमधील जिनेव्हा याठिकाणी आयोजित लिलावामध्ये 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला. प्रसिद्ध जवाहिर हॅरी विन्स्टन यांनी 5 कोटी डॉलर (सुमारे 363 कोटी रुपये) एवढी बोली लावून हा हिरा खरेदी केला. असे सांगण्यात येते की, आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला हा हिरा आहे. गेल्यावर्षी 15 कॅरेटच्या एका गुलाबी हिऱ्याला हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात सुमारे 3 कोटी 25 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली होती. त्यावेळी या हिऱ्यासाठी 21 लाख 76 हजार डॉलर प्रति कॅरेट एवढी विक्रमी बोली लागली होती. हा हिरा 100 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधील एका खाणीमध्ये सापडला होता. ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनच्या ज्वेलरी विभागाचे प्रमुख राहुल कदाकिया यांनी हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले.