1 किलोमीटर रेल्वे लाईन टाकण्यासाठी सरकारला किती खर्च येतो? आकडा ऐकून थक्क व्हाल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:01 IST2025-01-29T14:52:41+5:302025-01-29T15:01:26+5:30
Indian Railway : गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभागाचा वेगाने विस्तार होतोय. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे हा देशातील सर्वात जास्त कर्मचारी असलेला विभाग आहे.
गेल्या काही वर्षांपासून या रेल्वे विभागाचा वेगाने विस्तार होत आहे. देशाच्या काना-कोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. पण, तुम्हाला माहितेय का, एक किलोमीटर रेल्वे लाईन टाकण्यासाठी सरकारला नेमका किती कोटी खर्च येतो?
आजच्या काळात भारतीय रेल्वे प्रवासाचे प्रमुख साधन आहे. सरकारने गेल्या काही काळात देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचा विस्तार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे एका दिवसात सुमारे 13 हजार गाड्या चालवते. या गाड्यांद्वारे लाखो प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात.
भारतात रेल्वे मार्गांची लांबी 1,26,366 किलोमीटर आहे. यामध्ये रनिंग ट्रॅकची लांबी 99,235 किलोमीटर आहे, तर यार्ड आणि साइडिंग सारख्या गोष्टींसह एकूण मार्ग 1,26,366 किलोमीटरचा आहे.
भारतात रेल्वेला भारताची जीवनरेखा म्हटले जाते. भारतात रेल्वे स्थानकांची संख्या 8,800 पेक्षा जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेशात रेल्वे नेटवर्कची लांबी 9,077.45 किलोमीटर आहे.
भारतातील रेल्वेचा सातत्याने विस्तार होत आहे. अलीकडेच भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरला रेल्वे मार्गाने जोडले आहे. आता कोणताही प्रवासी ट्रेनमधून काश्मीरला सहज जाऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रेल्वेने टाकलेल्या लाईनला किती खर्च येतो?
तर, भारतात रेल्वे लाईन टाकण्याचा खर्च करोडोमध्ये होतो, परंतु तो जागेनुसार वाढतो किंवा कमी होतो. भारतात बनवल्या जाणाऱ्या रेल्वे रुळांना मैदानी भागात एक किलोमीटर अंतरासाठी 10 ते 12 कोटी रुपये खर्च येतो.
तसेच, डोंगराळ भागात रेल्वे ट्रॅक टाकण्याचा खर्च सपाट भागांपेक्षा जास्त आहे. तर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 1 किलोमीटर लांबीचा ट्रॅक टाकण्यासाठी 100 ते 140 कोटी रुपये खर्च येतो.