indias first plane restaurant starts in ludhiana
देशातलं पहिलं प्लेन रेस्टॉरंट पाहिलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 04:48 PM2018-04-21T16:48:35+5:302018-04-21T16:48:35+5:30Join usJoin usNext तुम्ही आतापर्यंत अनेक हॉटेल्स पाहिली असतील. मात्र तुम्ही कधी विमानातलं हॉटेल पाहिलंय का? लुधियानात भारतातलं पहिलं एअरप्लेन रेस्टॉरंट सुरू झालंय. सध्या हे रेस्टॉरंट अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. आलिशाय डायनिंग टेबल्स आणि लज्जतदार पदार्थ मिळणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये एकाचवेळी 180 माणसं बसू शकतात. या रेस्टॉरंटची उभारणी दिल्लीमध्ये करण्यात आली. यानंतर या रेस्टॉरंटला 4 ट्रक्सच्या मदतीनं लुधियानाला आणण्यात आलं. या रेस्टॉरंटच्या उभारणीसाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला. परमजीत सिंह यांना महाराज एक्स्प्रेस पाहून एअरप्लेन रेस्टॉरंटची कल्पना सुचली. मग त्यांनी विमानात रेस्टॉरंटची उभारणी करण्यास सुरुवात केली. इतर रेस्टॉरंटपेक्षा अतिशय हटके असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये बेकरी, कॅफे आणि पार्टी हॉलदेखील आहे. या रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं. देशाच्या विविध भागांमध्ये मिळणाऱ्या शाकाहारी पदार्थांची चव इथं चाखता येते. टॅग्स :जरा हटकेJara hatke