इथे लग्नानंतर तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही नवरी-नवरदेव, वाचा अजब कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:35 PM 2021-07-13T15:35:38+5:30 2021-07-13T15:48:28+5:30
जगात असाही देश आहे जिथे लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत नवरी-नवरदेवाला शौचालयाला जाता येत नाही. इथे लग्नानंतर तीन दिवस नव दाम्पत्यावर शौचालयाला जाण्यावर बंदी आहे. लग्नाचा उल्लेख होताच मजा-मस्तीसोबतच असतात अनेक रितीरिवाज. हे रितीरिवाज घरातील लोक आनंदाने पार पाडतात. प्रत्येक धर्म, जातीत वेगवेगळे रितीरिवाज असतात. मात्र, कधी कधी असेही रितीरिवाज बघायला मिळतात जे बघून हैराण व्हायला होतं.
जगात असाही देश आहे जिथे लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत नवरी-नवरदेवाला शौचालयाला जाता येत नाही. इथे लग्नानंतर तीन दिवस नव दाम्पत्यावर शौचालयाला जाण्यावर बंदी आहे. याचं कारण वाचून तुम्हीही अवाक् व्हाल आणि म्हणाल की, हे लोक असं कसं करू शकतात.
लग्नाचा हा अनोखा रिवाज इंडोनेशियातील टीडॉन्ग नावाच्या समाजात पाळला जातो. या रिवाजाबाबत या समाजात अनेक मान्यता आहेत. त्यानुसारच हे रिवाज पार पाडले जातात. चला जाणून घेऊ का हा अनोका रिवाज केला जातो.
लग्नाचा हा अनोखा रिवाज इंडोनेशियातील टीडॉन्ग नावाच्या समाजात पाळला जातो. या रिवाजाबाबत या समाजात अनेक मान्यता आहेत. त्यानुसारच हे रिवाज पार पाडले जातात. चला जाणून घेऊ का हा अनोखा रिवाज केला जातो.
इंडोनेशियाच्या टीडॉन्ग समाजातील लोक या रिवाजाला फार महत्वाचं मानतात आणि हा रिवाज ते फारच काळजीपूर्वक करतात. या रिवाजामागील मान्यता अशी आहे की, लग्न एक पवित्र समारोह असतो आणि जर वर-वधू शौचालयात गेले तर त्यांची पवित्रता भंग होईल. ते अशुद्ध होतील.
याकारणानेच लग्नाच्या तीन दिवसांपर्यंत नवरी-नवरदेवाच्या शौचालयास जाण्यावर बंदी असते. जर कुणी असं केलं तर त्याला अपशकुन मानला जातो.
इंडोनेशियातील टीडॉन्ग समाजात हा रिवाज करण्यामागे आणखी एक कारण आहे. ते कारण म्हणजे नव्या जोडप्याला वाईट नजरेपासून वाचवणं. या समाजातील लोकांच्या मान्यतांनुसार, जिथे लोक मल त्याग करतात तिथे घाण असते. ज्यामुळे तिथे नकारात्मक शक्ती असतात.
जर नवरीनवरदेव लग्नानंतर लगेच शौचास गेले तर त्यांच्यावर नकारात्मकतेचा प्रभाव होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या संसारात अडचणी येऊ शकता. नात्यात दरी निर्माण होऊ शकते आणि नातंही तुटू शकतं, असा समज आहे.
या समाजातील लोक असं मानतात की लग्नानंतर लगेच नवरी-नवरदेव शौचालयाचा वापर करतील तर त्यांच्यासाठी ते फार नुकसानकारक असतं. अशात दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका होऊ शकतो.
अशात लग्नाचे रितीरिवाज पार पाडत असताना दोघांनाही कमी खायला दिलं जातं. जेणेकरून काही समस्या होऊ नये आणि त्यांनी रितीरिवाज योग्यपणे पार पाडावे.