पेंटहाऊस आतून कसं दिसतं? बघा १९० कोटी रूपयांना विकलेल्या गेलेल्या फ्लॅटचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 02:45 PM2024-12-09T14:45:17+5:302024-12-09T15:02:03+5:30

सामान्यपणे १ ते दीड कोटी रूपये किंमतीचे फ्लॅट लोकांना माहीत असतात. मात्र, हा फ्लॅट १९० कोटी रूपयांना विकला गेलाय.

Gurugram Rs 190 crore Flat: गुरूग्राममधील एका फ्लॅटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या फ्लॅटची किंमत तब्बल १९० कोटी रूपये इतकी आहे. सामान्यपणे १ ते दीड कोटी रूपये किंमतीचे फ्लॅट लोकांना माहीत असतात. मात्र, हा फ्लॅट १९० कोटी रूपयांना विकला गेलाय.

हरयाणाच्या गुडगावमध्ये या फ्लॅट किंवा अपार्टमेंटची विक्री झाली. डीएलएफचे 'द कॅमोलियाज' प्रोजेक्टमध्ये हा फ्लॅट विकला गेला. १६, २९० वर्ग फुटाच्या या फ्लॅट किंमतीच्या बाबतीत एक बेंचमार्क तयार केला आहे.

हा फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने रजिस्ट्रीसाठी १३ कोटी रूपये दिले. या फ्लॅटची खरेदी गेल्याच आठवड्यात झाली. हा फ्लॅट देशातील सगळ्यात महागड्या अपार्टमेंटपैकी एक झाला आहे.

190 कोटी रूपयांचा हा फ्लॅट इन्फो-एक्स सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी प्रायवेट लिमिटेडचे निर्देशक ऋषी पारती यांनी खरेदी केलाय. ते वेगवेगळ्या कंपन्यांचे मालकही आहेत.

पेंटहाऊस अर्थ होतो असा फ्लॅट किंवा अपार्टमेंट जो एका मोठ्या इमारतीच्या टॉपवर बनवला जातो. पेंटहाऊसमध्ये इमारतीच्या टेरेसवर मोठमोठ्या रूमचे आरामदायक फ्लॅट्स असतात.

ही अपार्टमेंट बिल्डींगच्या सगळ्यात टॉप फ्लोरवर असतो. पूर्ण बिल्डींगमध्ये केवळ एकच पेंटहाऊस बनवू शकतात. ज्यामुळे त्याची किंमतही अधिक असते.

पेंटहाऊसमध्ये लक्झरी इनडोरसोबतच अनेक आधुनिक सोयी सुविधाही असतात. यात स्वीमिंग पूल, आलिशान बाथरूम, गार्डनचाही समावेश असतो.