Interesting and mysterious facts of Uranus planet
४२ वर्षांचा दिवस अन् ४२ वर्षांची रात्र; पृथ्वीपेक्षा २० पटीने मोठा आहे 'हा' रहस्यमय ग्रह! By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:13 PM2020-02-04T15:13:31+5:302020-02-04T15:37:34+5:30Join usJoin usNext युरेनस या ग्रहाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच. या ग्रहाला गॅसचा राक्षसही म्हटलं जातं. कारण या ग्रहावर माती-दगडांपेक्षा जास्त गॅस आहे आणि याचा आकारही विशाल आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा सूर्यमालेतील एकुलता एक असा ग्रह आहे ज्याला टेलिस्कोपने शोधलं गेलं. सूर्यमालेतील ८ ग्रहांपैकी सर्वात दूर असलेला हा सातवा ग्रह आहे. आज याबाबतच्या खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Image Credit : worldatlas.com) युरेनस हा स्वताभोवती साधारण १७ तासात एक फेरी पूर्ण करतो. याचाच अर्थ हा आहे की, युरेनसवर एक दिवस केवळ १७ तासांचा असतो. तर येथील एक वर्ष पृथ्वीच्या ८४ वर्षां इतकं असतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, युरेनसवर ४२ वर्ष रात्र आणि ४२ वर्ष दिवस राहतो. याचं कारण दोनपैकी एक ध्रुव लागोपाठ ४२ वर्ष सूर्यासमोर आणि एक भाग अंधारात राहतो. युरेनस हा ग्रह सूर्यापासून जवळपास तीन अब्ज किलोमीटर दूर आहे. हेच कारण आहे की, हा ग्रह फार थंड आहे. येथील सरासरी तापमान १९७ डिग्री सेल्सिअस असतं. (Image Credit : haikudeck.com) पृथ्वीला एक चंद्र आहे तर युरेनसला एकूण २७ उपग्रह म्हणजे चंद्र आहेत. पण यातील जास्तीत जास्त चंद्र छोटे आणि असंतुलित आहेत. यांचा भारही कमी आहे. युरेनस हा ग्रह ९८ डिग्री झुकलेला आहे. हे कारण आहे की, येथील वातावरण फारच असामान्य राहतं. इथे नेहमी वादळासारखं वातावरण असतं. तसेच वेगवान हवा असते आणि या हवेचा वेग ९०० किलोमीटर प्रति तास इतका असतो. युरेनस ग्रहावर ढगांचे अनेक थर बघायला मिळतात. सर्वात वर मीथेन गॅस असतो. तसेच या ग्रहाच्या केंद्रात बर्फ आणि दगड आहेत. वैज्ञानिकांनुसार, युरेनस ग्रहावर मीथेन गॅस अधिक आहे. तापमान आणि हवेमुळे इथे हिऱ्यांचा पाऊसही पडतो. (Image Credit : worldatlas.com) सूर्यापासून अधिक दूर असल्या कारणाने या ग्रहावर सूर्याची किरणे पोहोचायला दोन तास ४० मिनिटांचा वेळ लागतो. हा ग्रह पृथ्वीपेक्षा जवळपास २० पटीने अधिक मोठा आहे. पृथ्वीवर सूर्याची किरणे पोहोचायला आठ मिनिटे १७ सेकंदाचा वेळ लागतो.टॅग्स :इंटरेस्टींग फॅक्ट्सजरा हटकेInteresting FactsJara hatke