'हा' किंमती 'दगड' मिळवण्यासाठी अमेरिका-चीनमध्ये लागली शर्यत, छोटासा तुकडा बदलणार तुमचं नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:46 AM2021-06-01T11:46:44+5:302021-06-01T11:56:56+5:30

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की, या दगडात असं काय आहे की, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. आणि त्याविषयी माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

तसं तुम्ही अनेक किंमती रत्नांसाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचं ऐकलं असेल. पण तुम्हाला माहीत नसेल एक असाही दगड आहे ज्याची किंमत पृथ्वीवर सापडणाऱ्या प्रत्येक धातूपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की, या दगडात असं काय आहे की, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. आणि त्याविषयी माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

आम्ही ज्या दगडाबाबत बोलत आहोत त्याल मून गोल्ड असं म्हणतात. मून गोल्ड म्हणजे चंद्रावरून आणलेला दगड. यात सोन्याच्या कणांसोबतच अनेक मूल्यवान धातूही असतात. ज्यामुळे या दगडाला इतकी किंमत आहे.

असं असलं तरी संशोधकांनी याचा खुलासा केला नाहीये की, यात सोनं आणि प्लॅटिनमशिवाय आणखी कोणते धातू असतात. मात्र, या दगडात याचा पुरावे मिळतात की, यात नॉन-रेडीओअॅक्टिव हीलियम ३ असेल. ज्याने न्यूक्लिअर रिअॅक्टरला मदत मिळेल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की १४ डिसेंबर १९७२ ला नासाचा अंतराळवीर यूजीने केर्ननने सर्वातआधी अपोलो १७ लूनर मॉड्यूलमधून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावरून एक दगड उचलला होता. ज्यानंतर असे अनेक दगड पृथ्वीवर आणले गेले.

वैज्ञानिकांकडून दावा केला जात आहे की, या दगडांमध्ये सोनं आणि प्लॅटिनमसारखे किंमती धातूचा भांडार आहे. हेच कारण आहे की, या दगडांची किंमत इतकी जास्त आहे.

या किंमत दगडाच्या उत्खननासाठी अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा रंगली आहे. दोन्ही देश जास्तीत जास्त मून गोल्ड पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नात लागले आहेत.

तज्ज्ञांनुसार, जगभरातील महाशक्ती असलेल्या देशांची चंद्रावर वस्ती वसवण्याची योजना आहे. हे बघता चीनने खूप आधीपासूनच या योजनेवर काम करत चंद्रावर उत्खननाचं काम सुरू केलं आहे.

चीनचा मानस २०३६ पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती वसवण्याचा आहे. त्यादृष्टीने चीनने पावले सुद्धा उचलणं सुरू केलं आहे. त्यामुळे अमेरिकाही वेगाने यासंबंधी कामे करत आहे. दोन्ही देशात या किंमत दगडावरून स्पर्धा बघायला मिळणार आहे.