अंटार्क्टिकावर होतं हिटलरचं सिक्रेट बेस? जाणून घ्या काय खरं काय खोटं....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 02:23 PM2020-02-03T14:23:59+5:302020-02-03T14:41:42+5:30

अंटार्क्टिका हे जगातलं सर्वात थंड महाद्वीप आहे. हे ठिकाण बर्फाने पूर्णपणे झाकलं गेलं आहे. हेच कारण आहे की, इथे लोक राहत नाहीत. केवळ वैज्ञानिकांनीच इथे रिसर्चसाठी एक रिसर्च स्टेशन तयार केलं आहे. इतर जगापासून दूर असल्याने आणि लोकांची वस्ती नसल्याने अंटार्क्टिकाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकता आहे. तशा तर यातील बऱ्याच गोष्टी खोट्या असतात. आज अशाच एका अफवेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नाझींनी लपवली तबकडी - एक अशीही अफवा नेहमी चर्चेत असते की, अंटार्क्टिकामध्ये नाझी लोकांनी एक तबकडी लवपून ठेवली आहे. ही बाब खोटी आहे. केवळ इतकंच खरं आहे की, हिटलरने एक जहाज इथे पाठवलं होतं. त्याने हे जहाज खास जागा शोधण्यासाठी पाठवलं होतं. पण हे जहाज परत आलं. (Image Credit : express.co.uk)

अस्तित्वावर शंका - पृथ्वी चपटी असण्याचा दावा करणारे लोक हे मानतात की, मुळात अंटार्क्टिका अशा स्थानाचं काही अस्तित्वच नाही. त्यांची थेअरीनुसार, उत्तर ध्रुव पृथ्वीचा केंद्रात आहे. तर दक्षिण ध्रुवाने जगाला वेढलं आहे. (Image Credit :gadventures.com)

जमिनीखाली जाण्याचा मार्ग - जानेवारी २०१९ मध्ये नासा आणि जर्मन एरोस्पेस सेंटरच्या वैज्ञानिकांनी एका क्रेटरची माहिती मिळवली होती. हे क्रेटर अंटार्क्टिकाच्या पर्माफ्रोस्टच्या बरंच खाली आहे. पर्माफोस्टमध्ये बर्फ गोठल्याने तापमान फार खाली जातं. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, लाखो वर्षांआधी क्षुद्रग्रहाने पृथ्वीला दिलेल्या धडकेने हा क्रेटर तयार झाला. तर काही लोकांचं असं मत आहे की, हा पृथ्वीच्या आत जाण्याचा मार्ग आहे. (Image Credit : geologyin.com)

अंटार्क्टिकामध्ये तबकडी क्रॅश - अंटार्क्टिकाच्या जमिनीवर एक मोठी भेग आहे. ही भेग इतकी मोठी आहे की, गुगल अर्थमध्येही दिसते. त्यामुळे लोकांचं असं मत आहे की, इथे एक तबकडी क्रॅश झाली होती. तेच भूवैज्ञानिकांचं असं मत आहे की, ही भेग एका वादळामुळे पडली आहे. (Image Credit : the13thfloor.tv)

एलियनने वाचवले आइसबर्ग - वैज्ञानिकांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला होता की, इथे एक भव्य चौकोणी आकाराचा आइसबर्ग सापडला. हे आइसबर्ग इतके मोठे आहे की, अंतराळातूनही दिसतात. हे आइसबर्ग मानवनिर्मित अधिक वाटतात. लोकांचं मत आहे की, हे आइसबर्ग एलियनने तयार केले. पण वैज्ञानिक सांगतात की, हे आइसबर्ग एक मोठा आइसबर्ग तुटल्याने तयार झाले आहेत. (Image Credit : nzherald.co.nz)

इथे आहे हरवलेलं शहर - १९५० मध्ये इतिहासकार चार्ल्स हॅपगुज म्हणाले होते की, अंटार्क्टिकामध्येही एक संस्कृती वाढत होती. त्यांच्यानुसार, पूर्वी अंटार्क्टिका बर्फाने झाकलेला नव्हता. पण याचे काहीच पुरावे नाही. अनेक वैज्ञानिकांचं असं मत आहे की, इथे आधी कोणतंही शहर नव्हतं. (Image Credit : dailystar.co.uk)

अंटार्क्टिकामध्ये हिटलरचा सिक्रेट बेस - नाझींबाबत आणखी एक असा दावा केला जातो ज्यात काहीच तथ्य नाही. याचा काहीच पुरावा नाही की, हिटलरने अंटार्क्टिकामध्ये परमाणु परिक्षण केलं किंवा एखादं शस्त्र तयार केलं. एकदा नाझींनी एक जहाज १९३८ मध्ये तिथे पाठवलं होतं. पण दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने ते जहाज परत आलं होतं. (Image Credit : express.co.uk)

अंटार्क्टिकामध्ये पिरॅमिड्स - २०१६ मध्ये अंटार्क्टिकामध्ये तीन पिरॅमिड शोधण्यात आले होते. यांची लांबी १,२०० मीटर होती म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिडपेक्षा १० पटीने उंच पिरॅमिड होते. पण वैज्ञानिकांनी हा दावा खोडून काढला. ते म्हणाले ही हे पिरॅमिड हॉर्न किंवा नूनाटक आहेत. जे एखाद्या डोंगराच्या तुटण्याने तयार होतात. ते दिसायला पिरॅमिडसारखेच असतात. (Image Credit : livescience.com)