Interesting news related to the business of farming and animal husbandry
मालकानं ७० लाखालाही विकला नाही बकरा; म्हणाला, दीड कोटीलाच विकणार, अन् नाव ठेवलं..... By manali.bagul | Published: December 14, 2020 06:19 PM2020-12-14T18:19:03+5:302020-12-14T18:24:27+5:30Join usJoin usNext लॉकडाऊनच्या काळात गेल्या महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. या बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला बकरा विक्रीसाठी आला होता. या बकऱ्याचे नाव मोदी बकरा आहे. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. बाजारात या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली. होती बकऱ्याचा मालक आपल्या जिद्दीवर अडून राहिला. मोदी नावाच्या या बकऱ्याला बाजारात त्यांनी दीड कोटी बोली लावली होती आणि यावेळी 70 लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकले नाही.टॅग्स :जरा हटकेमहाराष्ट्रJara hatkeMaharashtra