जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंजूसीचे कमाल किस्से, दुसऱ्यांची शिल्लक राहिलेली सिगारेटही ओढायचा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:02 PM 2022-08-24T13:02:55+5:30 2022-08-24T13:10:59+5:30
Richest person on earth Mir Osman Ali Khan : 1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र मिळालं तेव्हा निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जात होता. त्यावेळी त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती तेवढी जगात कोणत्याच व्यक्तीकडे नव्हती. जगातल्या अनेक श्रीमंत लोकांबाबत आणि त्यांच्या सवयींबाबत तुम्ही ऐकलं असेल. श्रीमंत लोकांचे शौकही विचित्र असतात. तर काही श्रीमंत लोक कमालीचे कंजूसही असतात. आज आम्ही तुम्हाला एका अशाच निजामाबाबत सांगणार आहोत जो श्रीमंतीच्या बाबतीच खूप मोठा होता, पण तो इतका कंजूस होता की, त्याचा कुणी विचारही केला नसेल. ही व्यक्ती हैद्राबादचा शासक निजाम होता.
1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र मिळालं तेव्हा निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जात होता. त्यावेळी त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती तेवढी जगात कोणत्याच व्यक्तीकडे नव्हती. पण तो इतका कंजूस होता की, लोक त्याची कंजूशी पाहून हैराण व्हायचे. आजही निजामाच्या परिवारातील लोकांचे जगातील वेगवेगळ्या बॅकेत अब्जो रूपये जमा आहेत. ज्यासाठी त्याचे वंशज कोर्टात केसेस लढत आहेत. पण निजाम त्यावेळी एक एक पैसा वाचवण्यासाठी एक एक आयडिया काढत होता.
1911 मध्ये ओसमान अली खान हैद्रबादचा निजाम झाला होता. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हैद्राबादचा भारतात समावेश झाला. तोपर्यंत ओसमान अली खान हाच शासक होता. त्यावेळी निजामाकडे 17.47 लाख कोटी म्हणजे 230 बिलियन डॉलर संपत्ती असल्याचा अंदाज होता. निजामाची एकूण संपत्ती त्यावेळी अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या 2 टक्क्यांच्या बरोबर होती.
निजामाकडे त्याची वेगळी करन्सी होती. नाणी बनवण्यासाठी त्याची फॅक्टरी होती. 100 मिलियन पाउंडचं सोनं, 400 मिलियन पाउंडचे हिरे-दागिने होते. निजामाचं उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन गोलकोंडा माइन्स होतं. ज्याद्वारे जगभऱात हिरे सप्लाय केले जात होते. निजामाकडे जॅकब डायमंड होता. त्यावेळी तो जगातल्या सात सर्वात महाग हिऱ्यांपैकी एक होता. त्याचा वापर निजाम पेपरवेट म्हणून करत होता. त्याची किंमत 50 मिलियन पाउंडच्या बरोबर होती.
प्रसिद्ध लेखक डोमनिक लॅपीयरे आणि लॅरी कॉलिन्स यांच्या त्यांच्या फ्रीडम अॅट मिडनाइट या पुस्तकात लिहिले की, निजाम हा केवळ पाच फूट 3 इंचाचा होता. तो एक शिकलेला, साहित्य आवडणारा आणि धर्माला मानणारा व्यक्ती होता. त्याच्या राज्यात दोन कोटी हिंदू आणि तीस लाख मुस्लीम लोक होते. निजाम हा त्यावेळचा एकुलता एक असा शासक होता ज्याला इंग्रजांनी एग्लाल्टेड हायनेस ही मोठी उपाधी दिली होती. कारण निजामाने पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटीशांना अडीच कोटी पाउंडची आर्थिक मदत केली होती. क्वीन एलिजाबेथ-2 जेव्हा राणी होत होती आणि तिचं लग्न होत होतं तेव्हा निजामाने गिफ्ट दिलेला शाही नेकलेस फार चर्चेत होती. या शाही नेकलेसमध्ये 300 हिरे लावले होते असं सांगितलं जातं.
पण निजामाच्या कंजूसीचे किस्सेही खूप लोकप्रिय आहेत. लेखकांनी लिहिलं की, निजाम हा जवळपास 100 अशा संस्थांनांचा शासक होता जिथे सोन्याच्या ताटात जेवण दिलं जात होतं. पण तो साध्या टपऱांच्या प्लेटांमध्ये जेवण करत होता. तोही खाली बसून. तो इतका दरिद्र मनाचा होता की, जर त्याच्याकडे आलेल्या पाहुण्याचे अर्धी सिगारेट फेकली तर तिच तो पित होता. तो प्रेस न केलेला पायजामा घालत होता. साध्या चपला वापरत होता. 35 वर्ष त्याने डोक्यावर एकच टोपी वापरली.
निजामाकडे संपत्ती बेसुमार होती. इतकी की, जर दुसऱ्या कुणाकडे इतकी संपत्ती असली असतील तर तो सोन्याच्या बेडवर झोपला असता. निमाजाचा महाल फारच समुद्ध होता. ज्याची किंमतही लावली जाऊ शकत नाही. त्यांच्या टेबलवर जॅकब हिरा पडलेला असायचा. शेकडो गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे होता. त्याच्याकडे हिरे-मोती हजारोंच्या संख्येने होते. त्यापेक्षा जास्त त्याच्याकडे सोनं होतं.
एकीकडे भारतातील इतर संस्थानांमधील राजे त्यांच्या रॉल्स रॉयस गाड्यांमुळे चर्चेत होते तेव्हा निजाम आपल्या कंजूशीमुळे चर्चेत होता. निजामाने आयुष्यात कधीच एक रूपयाही विनाकारण खर्च केला नाही. स्वत:साठी कार घेण्यासाठी निजाम वेगळी युक्ती लढवायचा. ज्याद्वारे नवीन शाही कार्स त्याच्या ताफ्यात येत होत्या. असं करत त्याच्या ताफ्यात शेकडो कार्स आल्या ज्यांचा वापर फार कमी झाला.
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा निजामाने भारतात विलिन होण्यास नकार दिला होता. त्यानंतर 1948 मध्ये भारतीय सेना हैद्राबादमध्ये शिरली. तेव्हा हैद्राबादचं विलिनीकरण भारतात झालं. अशाप्रकारे जगातल्या सर्वात श्रीमंत शासकाच्या राज्याचा अंत झाला. त्या काळाला 73 वर्ष उलटूनही आजही ब्रिटीश बॅंकांमध्ये निजामाचे 35 मिलियन पाउंड म्हणजे 3 अब्ज 28 कोटी रूपये जमा आहेत. ज्यावर पाकिस्तान आणि भारताने दावा केला आहे. तसेच निजामाच्या परिवारातील 400 लोकांनी दावा केला आहे.