आजपर्यंत या व्यक्तीचा उंचीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही, दोन वर्षाचा असताना चार फूट वाढला होता! By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:57 PM 2021-08-11T13:57:33+5:30 2021-08-11T14:12:22+5:30
रॉबर्ट अमेरिकेतील एल्टन शहरात राहत होते. २२ फेब्रुवारी १९१८ ला जन्मलेले रॉबर्टचे आई-वडील सामान्य उंचीचे होते. पण त्यांची उंची जन्माच्या काही महिन्यातच जास्त वाढू लागली होती. जगातील सर्वात उंच व्यक्तीचा वर्ल्ड रेकॉर्ड नेहमीच बदलत असतो. पण याबाबतचा एक वर्ल्ड रेकॉर्ड असाही आहे जो ८० वर्षांपासून कधीच कुणी मोडला नाही. १९४० पासून आतापर्यंत कुणीही हा रेकॉर्ड तोडू शकलं नाही. हा रेकॉर्ड जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून रॉबर्ट वॉड्लोच्या नावावर आहे.
त्यांना आतापर्यंतचा जगातला सर्वात उंच माणूस म्हणून ओळखलं जातं. त्यांची उंची आठ फूट ११.१ इंच होती. इतका उंच माणूस त्यांच्यानंतर पृथ्वीवर जन्मालाच आलेला नाही. गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आजही कामय आहे.
रॉबर्ट अमेरिकेतील एल्टन शहरात राहत होते. २२ फेब्रुवारी १९१८ ला जन्मलेले रॉबर्टचे आई-वडील सामान्य उंचीचे होते. पण त्यांची उंची जन्माच्या काही महिन्यातच जास्त वाढू लागली होती. केवळ सहा महिन्यात त्यांची उंची तीन फूट झाली होती.
रॉबर्ट जेव्हा एक वर्षाचे झाले होते तेव्हा त्यांची उंची तीन फूट सहा इंच होती. ते चार वर्षांचे झाले तेव्हा उंची चार फूट सहा इंचापेक्षा जास्त होती. १२ वयात ते सात फूट उंच झाले होते. त्यावेळी रॉबर्ट जगातील सर्वात उंच मुलगा होते.
१९३६ मध्ये केवळ १८ वयात रॉबर्ट जगातील सर्वात उंच व्यक्तीचा रेकॉर्ड तोडला होता. त्यावेळी त्यांची उंची आठ फूट चार इंच होती. सामान्यपणे लोक ९-१० किंवा ११ नंबरचा शूज घालतात. पण एका शूज बनवणाऱ्या कंपनीने रॉबर्टसाठी खास शूज बनवले होते. ज्याची साइज होती 37AA.
रॉबर्टला उंचीने प्रसिद्धी दिली. पण ही उंची त्यांच्यासाठी घातक ठरली. कारण त्यांच्या पायात आणि तळपायात कमजोरी आली होती. ज्यामुळे त्यांना चालण्यात अडचण येत होती.
पुढे त्यांना चालण्यासाठी आधाराची गरज पडत होती. त्यांच्या तळपायात एक फोडही झाला होता. ज्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं होतं. या सर्व समस्यांशी लढत १५ जुलै १९४० ला केवळ २२ वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला.
असं सांगितलं जातं की, रॉबर्टचा मृतदेह ४५० किलो वजनी बॉक्समद्ये टाकून दफन करण्यात आला होता. हा बॉक्स उचलण्यासाठी १२ पेक्षा जास्त लोक लागले होते. आजही त्यांच्या शहरात त्यांची एक उंच मूर्ती आहे.