international yoga day animals yoga
काल माणसांचा योगाभ्यास पाहिलात, आज प्राण्यांची योगासनं पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 10:39 AM2018-06-22T10:39:34+5:302018-06-22T10:39:34+5:30Join usJoin usNext काल जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंतप्रधानांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी योगासनं केली. मात्र आपल्या आसपास राहणारे प्राणीदेखील अनेकदा व्यायाम करतात. प्राण्यांच्या शरीराच्या हालचाली सुरू असताना अनेकदा त्यांच्याकडून योगासनं होतात. त्याचंच हे एक उदाहरण. या बछड्याच्या शारीरिक हालचालींवरुन तो शशांकासन करत असल्याचं दिसतं आहे. हे अतिप्रचंड हत्ती महाराज शीर्षासन करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसाची अगदी तंतोतंत नक्कल करुन हा सील भुजंगासन करतो आहे. प्रामाणिक प्राणी अशी ओळख असलेला कुत्रादेखील योगासनं करण्याचा प्रामाणिक करतो आहे. माणसांना पाहून हा ससोबादेखील योगासनं शिकतो आहेटॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिनजरा हटकेयोगInternational Yoga DayJara hatkeYoga