मच्छिमारांनी शोधलं हरवलेलं 'सोन्याचं आयलॅंड', सापडला अब्जो रूपयांचा खजिना By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:10 PM 2021-10-27T12:10:32+5:30 2021-10-27T12:25:55+5:30
Island Of Gold : इंडोनेशियाबाबत नेहमीच दावा केला जातो की, इथे खजिना आहे. या कारणामुळे गेल्या ५ वर्षापासून पालेमबांगजवळ मुसी नदीचा शोध काही मच्छिमार घेत होते. तुम्ही अनेक कथांमध्ये ऐकलं असेल की, अनेक ठिकाणी सोन्याचा खजिना असतो. पण मुळात असं फार कमी वेळा खरं ठरतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इंडोनेशियात काही मासेमाऱ्यांनी 'सोन्याचं बेट' शोधून काढलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून मच्छिमार या खजिन्याच्या शोधात होते आणि अखेर त्यांनी सोन्याचं बेट शोधून काढलं. जिथे भरपूर मोठा खजिना आहे.
इंडोनेशियाबाबत नेहमीच दावा केला जातो की, इथे खजिना आहे. या कारणामुळे गेल्या ५ वर्षापासून पालेमबांगजवळ मुसी नदीचा शोध काही मच्छिमार घेत होते. ज्यात मोठ्या प्रमाणात मगरी राहतात. जेव्हा मच्छिमारांना दुर्मीळ खजिन्याने भरलेलं बेट सापडलं तर ते हैराण झाले. या बेटाला 'सोन्याचं बेट' असं नाव देण्यात आलं आहे. इथे मूल्यवान रत्ने, सोन्याच्या अंगठ्या, नाणी आणि भिक्षुंच्या काही वस्तू सापडल्या आहेत. त्यासोबतच इथे आतापर्यंत सर्वात अविश्वसनिय शोधापैकी एक ८व्या शतकातील एक दागिने घातलेली बुद्धाची मूर्ती सापडली आहे. ज्याची किंमत लाखो पाउंड आहे.
'द गार्डियन'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कलाकृती श्रीविजय संस्कृतीतील आहे. श्रीविजय साम्राज्य ७व्या आणि १३व्या शतकामधे एक शक्तीशाली साम्राज्य होतं. एका काळानंतर हे साम्राज्य रहस्यमय पद्धतीने अचानक गायब झालं होतं. या साम्राज्याचं भारतासोबत जवळचं नातं होतं. ब्रिटीश समुद्री पुरातत्ववादी डॉ. सीन किंग्सलेनुसार, हे साम्राज् वॉटरवर्ल्ड होतं.
येथील लोक आजकाल प्रमाणे लाकडीच्या बोटी बनवायचे आणि त्यांचा वापर करायचे. त्यासोबतच काही लोकांनी त्यांची घरेही नावेवरच तयार केली होती. जेव्हा हे साम्राज्य संपलं. तेव्हा त्यांचे लाकडी घरे, महाल आणि मंदिरं त्यांच्यासोबत बुडाले.
डॉ. सीन किंग्सले म्हणाले की, 'श्रीविजया साम्राज्याबाबत सर्वात खास बाब म्हणजे या साम्राज्याने आपलं रहस्य पूर्णपणे लपवून ठेवलं होतं. या साम्राज्याच्या राजधानीत २० हजारांपेक्षा जास्त सैनिक होते. त्यासोबतच तिथे मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षुही राहत होते.
या साम्राज्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या ग्रुप्सने थायलॅंड ते भारतापर्यंत मोहिम चालवली होती. पण त्यांना यश मिळालं नाही. हे साम्राज्य पृथ्वीवरील अखेरचं साम्राज्य होतं जे अचानक गायब झालं. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात असाधारण गोष्टी समोर आल्या. काही नाणी, सोनं आणि बुद्धांच्या मूर्ती सापडत आहेत. इथे अनेक बहुमूल्य रत्नेही सापडली आहेत.
किंग्सले म्हणाले की, येथून जुनी भांडी आणि त्यावेळचे धुपदान सापडले आहेत. यावरून त्यावेळच्या लोकांनी किती विकास केला होता हे दिसून येतं. भारत, फारस आणि चीनमधून त्यावेळी टेबल वेअर साहित्य आयात केलं जात होतं. ते म्हणाले की, श्रीविजया काळात कांस्य आणि सोन्याच्या बुद्ध मूर्ती असलेली मंदिरे होती. या ठिकाणाचा समुद्र मंथनाशीही संबंध सांगितला जातो. तसेच इथे अनेक अशा कलाकृती सापडल्या ज्या भारत आणि हिंदू मान्यतांशी संबंधित आहेत.
किंग्सले म्हणाले की, येथून जुनी भांडी आणि त्यावेळचे धुपदान सापडले आहेत. यावरून त्यावेळच्या लोकांनी किती विकास केला होता हे दिसून येतं. भारत, फारस आणि चीनमधून त्यावेळी टेबल वेअर साहित्य आयात केलं जात होतं. ते म्हणाले की, श्रीविजया काळात कांस्य आणि सोन्याच्या बुद्ध मूर्ती असलेली मंदिरे होती. या ठिकाणाचा समुद्र मंथनाशीही संबंध सांगितला जातो. तसेच इथे अनेक अशा कलाकृती सापडल्या ज्या भारत आणि हिंदू मान्यतांशी संबंधित आहेत.
एका रिसर्चमध्ये अंदाज लावण्यात आला आहे की, श्रीविजया साम्राज्याची राजधानीत साधारण २० हजार सैनिक, हजार बौद्ध भिक्षु आणि साधारण ८०० सावकार राहत होते. यावरून अंदाज लावला जातो की, लोकसंख्याही मोठी असेल. या साम्राज्याचं पतन कसं झालं याचा कुणाकडेही ठोस पुरावा नाही. डॉ. किंग्सले यांच्या अंदाजानुसार, इंडोनेशियातील हे साम्राज्य ज्वालामुखीचा शिकार झालं होतं. त्यासोबत अंदाही अंदाज आहे की, नदीला आलेल्या भीषण पूरामुळेही या साम्राज्याचं पतन झालं असेल.