Japan Nagoro Village Has Only 27 Humans
'या' गावात राहतात फक्त 27 माणसं; एकटेपणा दूर करण्यासाठी पुतळ्यांचा सहारा By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:19 PM2019-05-03T15:19:32+5:302019-05-03T15:37:03+5:30Join usJoin usNext जपानमध्ये शिकोकू टापूवर असलेल्या नागोरो गाव म्हणजे जेमतेम 27 लोकांचे. गावातील अनेकांनी दुसर्या गावात आश्रय घेतल्याने लहान मुलेही राहिली नाहीत. उरली ती सगळी वृद्ध माणसे. माणसेच नसल्याने ग्रामस्थांना खूप एकाकीपणा जाणवत असे. एका आजीबाईंना मग एक भन्नाट कल्पना सुचली. 69 वर्षाच्या या आजीने संपुर्ण गावात माणसांसारखे दिसणारे 270 पुतळे ठेवले ,जेणेकरून लोकांचा एकटेपणा दूर होईल. यामुळे या गावाला पुतळ्यांचे गावसुद्धा म्हणू लागले. ही गोष्ट आहे नागोरो गावांत राहणाऱ्या सुकिमी नावाच्या महिलेची आहे. या गावातील बऱ्याच लोकांनी रोजगाराच्या शोधात पलायन केले होते. सुकिमी आयानो नावाच्या महिलेची ही गोष्ट. या गावातील बर्याच लोकांनी रोजगाराच्या शोधात पलायन केले होते. त्यामुळे गावची लोकसंख्या फक्त 27 एवढीच राहिली होती. गावातील सर्वात लहान व्यक्ती 55 वर्षांचा आहे. आयनोने गावातील शाळा, बसस्डॅंड, किराणा दुकाने आणि खेळाच्या मैदानावर भरपूर पुतळे लावले. यामध्ये काही मले , पुरूष आणि महिलांच्या पुतळ्याचा समावेश आहे. टॅग्स :जपानजरा हटकेJapanJara hatke