japan virtual model immas 15 thousand social media followers
ती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:49 PM2019-01-23T15:49:43+5:302019-01-23T16:01:20+5:30Join usJoin usNext सोशल मीडियावर सध्या एका सुंदर दिसणाऱ्या मॉडेलने धुमाकूळ घातला आहे. इमा असं या जपानी मॉडेलचं नाव असून तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. इमा ही मॉडेल खरी नसून संगणकाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. सीजी मॉडलिंग कंपनीने इमा ही मॉडेल तयार केली असून ती हुबेहुब जिवंत व्यक्तीप्रमाणेच भासते. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मॉडेल तयार करण्यात आली आहे. इमाचे फोटो सध्या सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर इमाचे 15 हजाराहून अधिक फॉलोअर्स असून जपानमध्ये फक्त या मॉडेलच्याच नावाची चर्चा आहे. इमाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे सीजी वर्ल्ड मॅगझिनच्या फेब्रुवारी एडिशनच्या कव्हर पेजवर तिला स्थान देण्यात आले आहे. 3D टेक्नॉलॉजीच्या मदतीने 2018 मध्ये इमा ही मॉडेल तयार करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये इमा अत्यंत लोकप्रिय झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने याआधी अनेक व्हर्चुअल मॉडेल तयार करण्यात आल्या आहेत. मात्र इमा ही आतापर्यंतची सर्वात प्रसिद्ध मॉडेल ठरली आहे. टॅग्स :तंत्रज्ञानजपानtechnologyJapan