Japanese Company creates Bento Dial Wristwatch with Real Food
...तर लवकरच येणार हातावर ताट; जपानी घड्याळाचा न्याराच थाट By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 04:09 PM2019-09-13T16:09:09+5:302019-09-13T16:15:57+5:30Join usJoin usNext धकाधकीच्या दैनंदिन जीवनामुळे अनेकदा वेळेवर जेवता येत नाही. त्यामुळे जेवणाची आठवण करुन देणारं घड्याळ जपानमध्ये तयार करण्यात आलं. बेन्टो वॉचमध्ये अन्नपदार्थांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ खरेखुरे आहेत. या भन्नाट घड्याळाची डायल उघडा येऊ शकते. त्यातील पदार्थदेखील खाता येतात. घड्याळ घालणाऱ्या व्यक्तीला जेवणाची आठवण व्हावी यासाठी या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. घड्याळात जपानी लोक दररोज खात असलेल्या पदार्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ खाण्यासाठी घड्याळासोबत काटेदेखील देण्यात आले आहेत. हे भन्नाट घड्याळ अद्याप बाजारात आलेलं नाही. केवळ संकल्पना म्हणून या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र लवकरच या घड्याळाचं व्यावसायिक उत्पादन केलं जाऊ शकतं. टॅग्स :जरा हटकेजपानJara hatkeJapan