Jara Hatke : ना वीज, ना गॅस, ना मोबाईल, कुठल्याही सोईसुविधांविना ५० वर्षे डोंगरात राहिले, स्वत:ला असं ठेवलं जिवंत By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:48 AM 2023-03-17T11:48:33+5:30 2023-03-17T11:51:30+5:30
Jara Hatke: तुमच्यापैकी अनेकांना मोबाईलशिवाय केवळ एक दिवस राहायला सांगण्यात आलं तर तुम्ही राहू शकणार नाही. मात्र मात्र एक इसम गेली ५० वर्षे असं जीवन जगत आहे ज्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीचं नाव आहे फेब्रिजियो कार्डिनाली. इटलीतील रहिवासी असलेले ७२ वर्षीय कार्डिनाली यांनी वीज, गॅस, मोबाईल आदि सोईसुविधांविना आपल्या जीवनातील ५० वर्षे पर्वतांमध्ये घालवली आहेत. तुमच्यापैकी अनेकांना मोबाईलशिवाय केवळ एक दिवस राहायला सांगण्यात आलं तर तुम्ही राहू शकणार नाही. मात्र मात्र एक इसम गेली ५० वर्षे असं जीवन जगत आहे ज्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीचं नाव आहे फेब्रिजियो कार्डिनाली. इटलीतील रहिवासी असलेले ७२ वर्षीय कार्डिनाली यांनी वीज, गॅस, मोबाईल आदि सोईसुविधांविना आपल्या जीवनातील ५० वर्षे पर्वतांमध्ये घालवली आहेत.
फेब्रिजियो कार्डिनाली यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे विजेचा काहीच वापर होत नाही. ते गेल्या ५० वर्षापासून सार्वजनिक विजेच्या नेटवर्कपासून दूर साहतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्येही परिस्थितीतीशी जुळवून घेत जिवंत राहतात.
फेब्रिजियो कार्डिनली इटलीतील ईस्ट एड्रियाटिक किनाऱ्याजवळ एंकोनाजवळ एखा दगडांनी बांधलेल्या घरात राहतात. त्यांच्याकडे ना वीज आहे ना गॅस आहे, ना इनडोअर प्लंबिंगची सुविधा आहे.
फेब्रिजियो सांगतात की, मला जगाचा भाग बनण्यामध्ये काहीही स्वारस्य नव्हते. त्यामुळे मी सगलं काही सोडून दिलं. कुटुंबं, युनिव्हर्सिटी, मित्र स्पोर्ट्स टीम आणि पूर्णपणे वेगळ्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही काही मिळवण्यासाठी काही देता ते अधिक महत्त्वपूर्ण आहे.
फेब्रिजियो खाद्यतेलावर जळणाऱ्या दिव्यावर वाचन करतात. त्यांना शेजारी थोडीफार मदत करतात. ते फळे आणि भाज्या पिकवतात. जेतूनचं तेल बनवण्यासाठी जैतून आणि मधासाठी मधुमक्षिका पालन करतात. काही स्थानिक त्यांना फळे, धान्य आणि अन्य वस्तूंची विक्री करतो. तर तेही आपल्या गरजेच्या हिशेबाने वस्तूंची खरेदी विक्री करतात.
त्यांनी सांगितलं की, डोंगरावर त्यांच्यासोबत काही लोक राहतात. एक कोंबडा, काही कोंबड्या आणि मांजरीसारखी जनावरंही पाळलेली आहेत. फेब्रिजियो कार्डिनली जेवण बनवण्यासाठी आणि थंडीत उष्णता निर्माण करण्यासाठी डोंगरातून लाकडे गोळा करतात आणि त्याचाच वापर करतात.