jatinga valley assam famous for birds suicide
इथं शेकडो पक्षी करतात आत्महत्या; भारतातील रहस्यमय ठिकाण By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:49 PM2019-10-14T22:49:30+5:302019-10-14T22:52:28+5:30Join usJoin usNext बर्म्युडा ट्रँगलची रहस्यमय गोष्ट तुम्ही ऐकली असेल. असंच एक ठिकाण दक्षिण आसाममध्ये आहे. जतिंगा खोऱ्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे अनेकजण चक्रावून जातात. जतिंगा गावात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. कृष्ण पक्षातील रात्री अशा घटनांचं प्रमाण सर्वाधिक असतं. या दिवसांमध्ये संध्याकाळी हवेत धुरकटपणा असतो. याशिवाय वारादेखील वेगानं वाहतो. संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सर्वाधिक पक्षी आत्महत्या करतात. आत्महत्या करणाऱ्या पक्षांमध्ये स्थानिक आणि प्रवासी पक्षांच्या ४० प्रजातींचा समावेश असतो. यामागे अदृश्य शक्तींचा हात असल्याची चर्चा या भागात होते. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या घटनांना परिसरातील हवामान कारणीभूत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडणाऱ्या पक्षांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे झाडांना आदळून ते मृत्यूमुखी पडतात, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.टॅग्स :जरा हटकेJara hatke